सुधारणांना अतिक्रमणांचा अडसर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मध्य भागातील वाहतूक कोंडी; महापालिकेकडे योजना तयार

पुणे - शहराच्या मध्य भागात वाहनांच्या कोंडीतून पादचाऱ्यांची सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे योजना तयार आहे; परंतु या भागात वाढलेली अतिक्रमणे त्याला अडसर ठरत आहेत. ही अतिक्रमणे दूर झाली तरच वाहतूक सुरळीत होऊ शकेल.

बुधवार पेठ मजूर अड्डा ते दत्त मंदिर चौक, दत्त मंदिर ते टिळक पुतळा, रामेश्‍वर चौक ते शनिपार चौक, शनिपार चौक ते अप्पा बळवंत चौक या दरम्यान अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. तुळशीबागेतही आठ महिन्यांपूर्वी कारवाई झाली तरी आता परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

विश्रामबागवाड्यासमोर पादचारी लेनमध्येच अनधिकृत विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना नाइलाजाने रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. अतिक्रमणांची समस्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना कशी दिसत नाही, याचे कोडे नागरिकांना पडले आहे. एरवी गल्लीबोळातील ‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्यात तत्परता दाखविणारे वाहतूक पोलिस शाखेचे संबंधित निरीक्षक दत्त मंदिरासमोरील जागेत अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसत आहे. 

येथील अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई होत नसल्यामुळे वाहतूक सुधारणांच्या योजनांचा खेळखंडोबा झाला आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक आग्रही असूनही त्यांच्या सूचनांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. 
या बाबत स्थानिक नगरसेवक हेमंत रासने म्हणाले, ‘‘दत्त मंदिरापासून शिवाजी रस्त्याचे रुंदीकरण व्हायला हवे. तसेच पादचारी सुरक्षिततेच्या योजनांना आम्ही पाठबळ दिलेच आहे. अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. वाहतूक बेट उभारणे, रेलिंग टाकणे आदी उपाययोजना प्रशासनाला या पूर्वीच सुचविल्या आहेत.’’ 

दत्तमंदिरासमोर पादचारी मार्ग
दत्त मंदिरासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘पादचारी मार्ग’ विकसित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. दत्त मंदिरासमोरील जागेत वाहतुकीचे बेट उभारून रुंद रस्ता वाहतुकीसाठी वापरता येऊ शकतो. या रस्त्यावर दुभाजक टाकणेही शक्‍य आहे. या बाबतचा आराखडा महापालिकेकडे तयार आहे.

Web Title: encroachment problem for development