विवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान 

undavadi
undavadi

उंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी पुण्याहून आलेली. नवरदेव लग्नमंडपात पोचण्यापूर्वीच त्याला पानी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत शेजारीच सुरु असलेल्या श्रमदानाची माहिती मिळते. लागलीच नवरदेव- नवरीला घेऊन वऱ्हाडी मंडळीना घेवून सोनवडीत सुरु असलेल्या श्रमदानात सामील होतो. गावकरीही आनंदात मग्न होवून श्रमदानाला आणखी गती देतात. आणि बघता-बघता अर्ध्या ते पाऊण तासात पन्नास मीटर लांबीची (सी. सी. टी) सलग समतल चर (नऊ घनमीटर) खोदून पूर्ण केली. 

निमित्त होते, जराडवाडी येथील पांडुरंग किसन पवार यांची कन्या सेजल आणि पुणे हडपसर येथील शिवाजी किसन घोडके यांचे चिरंजीव रणजित यांच्या शुभविवाहाचे. जराडवाडी आणि सोनवडी सुपे या दोन गावांच्या शिव आहेत. दोन्हीही गावात उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई असते. या भागातील लोकांना सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सोनवडी सुपेकरानी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे.

 या उपक्रमात दररोज गावकऱ्यांचे माळरानावर श्रमदान सुरु आहे. पुण्याहून माळरानालगतच्या यशवंत लॉन्स कार्यालयात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना आणि नवरदेवाला नवरीच्या भागातील दुष्काळ आणि पाणी टंचाईची माहिती मिळाली. आणि ते चांगल्या विचाराने प्रेरित होवून लग्न लागण्यापूर्वीचं मिळालेला वेळ वाया न घालवता श्रमदानासाठी सरसावले.  शहरी भागातून आलेल्या लोकांनी उन्हा- तान्हाची पर्वा न बाळगता मोठ्या उत्साहाने श्रमदान केले. 

या उप्रक्रमामुळे नवरीच्या भागातील लोकांचा उत्साह वाढीस लागला असून कामाला आणखी गती येणार आहे.  श्रमदानानंतर गावच्या सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्यासह गावकऱ्यांनी नवरदेव रणजीत व नवरी सेजल तसेच वऱ्हाडी मंडळीचे आभार मानले. यावेळी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड व मयूर साळुंके उपस्थित होते.

श्रमदानानंतर येथील यशवंत लॉन्स कार्यालयात मोठ्या उत्साहात नवरदेव रणजीत व नवरी सेजल यांचा शुभविवाह पार पडला. 

जेवढे खर्च केले त्यापेक्षा कितीतरी पट जास्त देऊन गेले
"आज नवरदेव- नवरी आणि वऱ्हाडी मंडळीनी श्रमदानातून नऊ घनमीटर काम केले. या केलेल्या  कामामुळे एका पावसात नऊ हजार लिटर पाणी अडणार आहे. त्यामुळे त्यांनी जेवढे पाणी लग्नाला खर्च केले. त्यापेक्षाही कितीतरी पट्ट पाणी  आपल्याला देवून गेले." अशी प्रतिक्रिया पानी फाउंडेशनचे समन्वयक मयूर साळुंखे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com