उत्कृष्ठ जलसिंचनाबद्दल अभियंता पांडुरंग शेलार यांचा गौरव

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 5 जून 2018

खडकवासला : खडकवासला धरणातील उपलब्ध पाण्याचे शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून वर्षभरात ग्रामीण भागातील चार तालुक्यात नियोजन करून सहा आवर्तन दिले. तर त्यातील दोन आवर्तने ही उन्हाळ्यात दिली आहे. त्याबाबद्दल, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांचा जलसंपदा विभागामार्फत खात्याचे सचिव सी.ए.बिराजदार यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून
गौरविण्यात आले. 

खडकवासला कालव्याच्या निर्मीतीनंतर प्रथमच २०१७- १८ या पावसाळी वर्षात पुणे शहराच्या ४० लाख लोकसंख्येला व्यवस्थित मुबलक पाणी पुरवठा दिला. त्याचबरोबर, ग्रामीण भागात शेतीसाठी व पिण्यासाठी हवेली, दौड, इंदापूर, बारामती या चार तालुक्यांमध्ये एकूण सहा सिंचन आवर्तने दिली. सिंचनाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे या वर्षात कालव्यातून उन्हाळी दोन आवर्तने शेतक-यांसाठी दिली गेली. तसेच, उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन, व पाणीपट्टी वसूलीमध्ये सन २०१७-१८ मध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल शेलार यांचा सत्कार करण्यात आला आहे. 

पिण्यासाठी व ग्रामीण भागात सिंचनासाठी योग्य प्रमाणात पाणी मिळाले. तसेच रात्रंदिवस कालव्यावर गस्त घालून सिंचन केल्यामुळे इंदापूरच्या शेवटच्या भागातील सिंचन व्यवस्थित पार पडले. तसेच 1 ऑगस्ट पर्यंतच्या पाणी साठ्याचे नियोजन केले. 
सिंचनाच्या सहा आवर्तनांची विक्रमी ऐतिहासीक कामगिरीची नोंद घेत शासनाकडून त्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले आहे. शेतकरी व समाजातील सर्व स्तरावरुन त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Engineer Pandurang Shelar awarded for excellent water conservation