किरकोळ कारणावरून झालेल्या झटापटीत मनोरुग्णाचा मृत्यु; एकास अटक

dead.jpg
dead.jpg

पुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून मेकॅनिकल इंजिनिअरने मनोरुग्णास ढकलून दिल्यामुळे डोक्‍यास मार लागून मनोरुग्णाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता जनवाडी येथे घडली. 

अनिल रामचंद्र पगारे (वय 52, रा.जनवाडी) असे मृत मनोरुग्ण व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सीमा अनिल पगारे (वय 42) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी मयुर उर्फ गणेश ज्ञानेश्‍वर राहणे (वय 30, रा. रा.जनवाडी) यास अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अनिल व मयुर यांची समोरासमोर घरे आहेत. बुधवारी अनिल यांनी मयुरच्या आईस शिवीगाळ केली होती. त्याचा राग आल्याने मयुरने अनिल यांना शिवीगाळ करीत त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. त्यावेळी मयुरने अनिल यांना कठड्यावरुन ढकलून दिल्याने ते कठड्याहून खाली कोसळले. या घटनेत अनिल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

उपचारदरम्यान शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान पोलिसांनी मयुर यास ताब्यात घेतले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस.सरडे करत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com