अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया आजपासून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे -अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सात जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना 19 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून आवश्‍यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह सुुविधा केंद्रावर (फॅसिलिटी सेंटर) जायचे आहे. तेथे कागदपत्रांची पडताळणी होईल, ती अपलोड केली जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा अर्ज निश्‍चित केला जाईल. अर्जनिश्‍चितीनंतर त्याची पोच विद्यार्थ्यांनी न विसरता घ्यायची आहे. 

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक 

तपशील मुदत 
ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, 7 ते 19 जून 
अपलोड करणे, अर्ज निश्‍चिती 

संभाव्य गुणवत्ता यादी प्रसिद्धी 21 जून 

अर्ज भरणे, पडताळणीबाबत हरकती नोंदविणे 22 ते 23 जून 

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी 24 जून 

पहिल्या फेरीसाठी संवर्ग आणि 24 जून 
आरक्षणानुसार उपलब्ध जागांची माहिती 

पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या 25 ते 28 जून 
लॉग इनद्वारे पसंतीक्रम अर्ज सादर 
आणि निश्‍चित करणे 

पहिल्या फेरीतील संभाव्य जागावाटप 29 जून 

पहिल्या फेरीतील जागावाटपानुसार 30 जून ते 4 जुलै 
अर्ज निश्‍चिती केंद्रात (एआरसी) प्रवेश निश्‍चिती 

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 5 जुलै 

दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या 6 जुलै ते 8 जुलै 
लॉग इनद्वारे पसंतीक्रम अर्ज सादर 
आणि निश्‍चित करणे 

दुसऱ्या फेरीतील संभाव्य जागावाटप 9 जुलै 

दुसऱ्या फेरीत प्रथमच जागावाटप झाल्यास 10 ते 12 जुलै 
अर्ज निश्‍चिती केंद्रात जाऊन प्रवेश निश्‍चिती 

तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 13 जुलै 

तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या 14 जुलै ते 16 जुलै 
लॉग इनद्वारे पसंतीक्रम अर्ज सादर 
आणि निश्‍चित करणे 

तिसऱ्या फेरीतील संभाव्य जागावाटप 17 जुलै 

तिसऱ्या फेरीत प्रथमच जागावाटप झाल्यास 18 ते 20 जुलै 
अर्ज निश्‍चिती केंद्रात जाऊन प्रवेश निश्‍चिती 

Web Title: Engineering admission start today