इंजिनिअरिंगबाबत रविवारी मार्गदर्शन

sakal_vidya
sakal_vidya

पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व ‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ’ (एनएमव्हीपीएम) यांनी इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र निगडीमधील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृह येथे रविवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता होणार आहे.  

बारावी सायन्सनंतरचे करिअरचे पर्याय, करिअरची अचूक निवड, अभियांत्रिकी, डिप्लोमा तसेच आर्किटेक्‍चर प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शन, विविध शाखांमधील पर्याय, त्याचबरोबर अभियांत्रिकीनंतरच्या करिअर संधी, व्यवसाय मार्गदर्शन, शाखेची निवड, महाविद्यालय निवडीमधील तंत्र आदींबाबत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे, प्रा. विजय नवले व प्रा. रामदास बिरादार मार्गदर्शन करणार आहेत. 

त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कट ऑफ, स्कॉलरशिप, ऑनलाइन अर्ज कसे भरावेत, फ्रिज-फ्लोट-स्लाइड यांसारख्या पर्यायांचा योग्य वापर कसा करावा, ऑप्शन फॉर्म कसा भरावा, अर्ज भरताना कोणत्या चुका होतात व त्या कशा टाळाव्यात, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या प्लेसमेंट, रोजगार व करिअर संधी, पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण घेण्याचे फायदे, याविषयीच्या सर्व शंकांचे निरसन या चर्चासत्रातून होणार आहे. उपलब्ध संधी व विद्यार्थ्यांचा कल यांचा विचार करून करिअरचा योग्य निर्णय घेणे अतिशय योग्य ठरते. त्यामुळे हे चर्चासत्र विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे तितकेच पालकांसाठी त्यांच्या पाल्याच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

कधी    :    रविवार, १७ जून
केव्हा    :    सकाळी १० वा.
कोठे    :    पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृह, पी.सी.सी.ओ.ई. कॉलेज कॅम्पस, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, निगडी. 
वक्ते    :    प्रा. शीतलकुमार रवंदळे, प्रा. विजय नवले, प्रा. रामदास बिरादार.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९५४५९५४७३३
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com