स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत इंग्रजी संभाषणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य वाढावे, यासाठी आता ऑनलाइन कोर्सद्वारे (मूक) शिक्षण इंग्रजीचे धडे गिरवणार आहेत.

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य वाढावे, यासाठी आता ऑनलाइन कोर्सद्वारे (मूक) शिक्षण इंग्रजीचे धडे गिरवणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच मावळ, मुळशी, हवेली आणि आंबेगाव तालुक्‍यातील निवडक शाळांमधील शिक्षकांसाठी पहिल्या टप्प्यात हा अभ्यासक्रम चालविला जाणार आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या औरंगाबाद शाखेने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्याचे उद्‌घाटन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते झाले. जिल्हा शैक्षणिक विकास संस्थेच्या प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. तीन महिन्यांचा हा अभ्यासक्रम सुरवातीला सहाशे शिक्षक पूर्ण करतील. यात शिक्षकांना व्हिडिओ पाहायला मिळतील; तसेच ते शाळेत इंग्रजी शिकवित असताना तयार केलेले व्हिडिओही अपलोड करता येणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना गोल्ड, सिव्हर आणि ब्राँझपदके दिली जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: English conversation lessons in local schools