ऑडिओ बुकद्वारे घ्या मराठी साहित्याचा आनंद

Storytel
Storytel

पुणे - अभिजात साहित्याने परिपूर्ण असणाऱ्या भारतातील लोकप्रिय ऑडिओ बुक ॲप ‘स्टोरीटेल इंडिया’ने खास मराठी श्रोत्यांसाठी ‘सिलेक्‍ट मराठी’ ही नवीन सेवा १५ जुलैपासून उपलब्ध केली आहे. या सेवेद्वारे श्रोत्यांना फक्त मराठी पुस्तकांचा आनंद घेता येईल. विशेष करून मराठी भाषेतील रसिक श्रोते स्टोरीटेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याने जगात पहिल्यांदाच ही सोय या ॲपने उपलब्ध करून दिली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टोरीटेल ॲप डाऊनलोड केले की आता ‘स्टोरीटेल अनलिमिटेड’ व ‘स्टोरीटेल सिलेक्‍ट मराठी’ असे दोन पर्याय उपलब्ध होतील. यातील ‘स्टोरीटेल अनलिमिटेड’मध्ये आठ भाषांतील पुस्तके दरमहा केवळ २९९ रुपयांत उपलब्ध असतील. तर, स्टोरीटेल ‘सिलेक्‍ट मराठी’ फक्त ९९ रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. यातील ‘सिलेक्‍ट मराठी’ पर्याय निवडल्यास श्रोत्यांना फक्त मराठी भाषेतील पुस्तके ऐकावयास मिळतील.

‘सिलेक्‍ट मराठी’बाबत स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ म्हणाले, ‘‘मला अनेक कार्यक्रमांमध्ये प्रश्न विचारला जायचा की ऑडिओ बुक केवळ श्रोत्यांच्या मातृभाषेत का उपलब्ध होत नाहीत. हाच विचार डोक्‍यात ठेवून, आम्ही ‘सिलेक्‍ट मराठी’ हे नवीन फिचर फक्त मराठी श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिले. यामुळे स्टोरीटेल ॲपमध्ये सिलेक्‍ट मराठी पर्याय निवडल्यास श्रोते फक्त मराठी पुस्तकं ऐकू शकतात. याद्वारे मराठी पुस्तकं अनेक लोकांपर्यंत पोचविण्याचे आमचे आमचे ध्येय आहे. नव्या पिढीतील लेखकांची स्टोरीटेल ओरिजनल ऑडिओबुक्‍सही सर्वांना ऐकता येतील.’’ 

स्टोरीटेल येत्या काही महिन्यांत २०० हून अधिक ऑडिओ बुक्‍स प्रकाशित करणार आहे व दरमहा उत्तमोत्तम साहित्याची भर स्टोरीटेल ‘सिलेक्‍ट मराठी’त होत राहणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com