Vidhan Sabha 2019 : मांजरी बुद्रुक, साडेसतरानळी परिसरात उत्साहात मतदान

manjari.jpg
manjari.jpg

मांजरी : अपेक्षित नसतानाही पावसाने उघडीप दिल्याने मांजरी बुद्रुक, साडेसतरानळी परिसरात मतदारांनी उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. पावसाच्या उघडीपमुळे सकाळीच आपले मतदान करून घेण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत तीस टक्क्याच्यावर मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केले.

मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या बुथवर खेळीमेळीचे वातावरण दिसत होते. तरुण-तरुणी उत्साहाने जेष्ठ नागरिक महिलांना मतदानाला जाण्यासाठी मदत करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यापूर्वी मतदानाच्या वेळी कायमच तणावाचे वातावरण अनुभवास मिळणाऱ्या मांजरी गावठाणात यावेळी मात्र शांतता आणि उत्साही वातावरण पाहावयास मिळाले.

मांजरी बुद्रुक व गोपाळपट्टी येथील जिल्हा परिषद शाळा, महादेव नगर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, साडेसतरानळी येथील प्राथमिक शाळा आदी मतदान केंद्रावर सकाळी नऊच्या सुमारास मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी आले होते. नवमतदारांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद ओसंडत होता. कार्यकर्ते परिसरात फिरून मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचा आग्रह करताना दिसले.
महानगरपालिकेकडून प्रत्येक केंद्रावर प्लास्टिक कचरा विरोधी मोहिमेबाबत प्रबोधन करण्यात आले. अनेक मतदार त्याबाबतच्या पोस्टर सोबत अभिमानाने मतदान केले गेल्याचे दाखवत फोटो काढून घेत होते. विशेषत: तरुण मतदारांनी त्याठिकाणी फोटो काढण्याचा आनंद घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com