'इग्नू' नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा शनिवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

देशभरातील 47 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, यंदा 4 हजार 626 उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले आहेत. यासाठी प्रवेश पत्र www.ignou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षेला येण्यापूर्वी त्याची प्रिंटआऊट काढून उमेदवारांनी घ्यावी. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 45 मिनीट आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.

पुणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा शनिवारी (ता. 9) सकाळी साडे दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. पुणे विभागातील उमेदवारांची परीक्षा लष्कर भागातील आझम कॅम्पस येथील अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय या केंद्रावर होणार आहे.

देशभरातील 47 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, यंदा 4 हजार 626 उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले आहेत. यासाठी प्रवेश पत्र www.ignou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षेला येण्यापूर्वी त्याची प्रिंटआऊट काढून उमेदवारांनी घ्यावी. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 45 मिनीट आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.

पुणे विभागातील उमेदवारांना प्रवेशपत्र मिळण्यास अडचणी येत असतील किंवा डाऊनलोड होत नसेल तर त्यासाठी त्यांनी 'पहिला मजला, एमएसएफसी बिल्डींग, 270, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे संपर्क साधावा, असे इग्नूतर्फे कळविण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrance Exam for 'IGNOU' Nursing Course on Saturday

टॅग्स