वळतीकरांचे प्रवेशद्वार उभारणीचे अनेक वर्षाचे स्वप्न अखेर पु्र्ण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

entrance of Valati dream has finally come true villagers donated 45 lakhs for construction of the entrance gate pune

वळतीकरांचे प्रवेशद्वार उभारणीचे अनेक वर्षाचे स्वप्न अखेर पु्र्ण...

निरगुडसर : (नवनाथ भेके,निरगुडसर) वळती(ता.आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी एकोप्यातुन जमा केलेल्या ४५ लाख रुपये देणगीतुन गावासाठी सुसज्ज असे प्रवेशद्वाराची उभारणी केली आहे,अनेक वर्षाचे वळतीकरांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोर आणि भाऊसाहेब भापकर यांनी पुढाकार घेतला आणि वळतीकरांचे अनेक वर्षाचे प्रवेशद्वार उभारणीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे, ग्रामस्थांनी देणगीतून तब्बल 45 लाख रुपये खर्चून प्रवेश द्वार उभारले असून हे कार्य अनेक गावांना प्रेरणा देणारी आहे.

गावाला प्रवेशद्वार नसेल तर शोभा नाही त्यामुळे गावाची शोभा वाढवण्यासाठी प्रवेशद्वार गावाला पाहीजे,प्रवेशद्वार नसल्याने गावाच्या वैभवात कुठे तरी कमीपणा जाणवत होता आणि गावाला प्रवेशद्वार पाहीजे असल्याचे स्वप्न अनेक वर्षापासुन ग्रामस्थ उराशी बाळगुन होते परंतु पुर्ण काही होईना परंतु गावातील दोन तरुण सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोर आणि भाऊसाहेब भापकर यांनी ग्रामस्थांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि कामाला सुरुवात झाली जसे जसे प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात झाली तसे ग्रामस्थांकडुनही देणग्याचा ओघ वाढु लागला यासाठी कुठल्याही निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकजुटीतून देणगी रुपी सहकार्यातून आपल्या गावात प्रवेशद्वाराची उभारणी केली आहे.

तब्बल 45 लाख रुपये खर्चून उभारलेले प्रवेशद्वार उभे राहूील्याने वळती गावाच्या वैभवात आणखी भर पडली असुन ग्रामस्थांचे अनेक वर्षाचे स्वप्न आज ख-या अर्थाने सत्यात उतरले आहे अनेक वर्षापासुनची इच्छा पुर्ण झाली असुन ४५ लाख रुपयांचे भव्यदिव्य असे प्रवेशद्वार ग्रामस्थांच्याच देणगीतुनच साकारल्यामुळे परीसरातुन वळती ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक उभे करण्यात आले असुन संपुर्ण प्रवेशद्वाराला विदयुत रोषणाई करण्यात आली आहे,प्रवेशद्वाराला करण्यात आलेली विदुयत रोषणाई एक आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे.

गृहमंञ्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ रविवार ता.01 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे यावेळी माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व शिरूर चे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे तसेच हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे,सकाळी भव्य मिरवणूक आणि रात्री जय मल्हार संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोर आणि सरपंच आनंद वाव्हळ यांनी दिली.

Web Title: Entrance Of Valati Dream Has Finally Come True Villagers Donated 45 Lakhs For Construction Of The Entrance Gate Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewspuneVillages
go to top