विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे विद्यापीठाने सुरू केला उद्योजक घडवणारा डिप्लोमा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस आणि आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (ईडीआयआय) यांच्यामध्ये करार  झाला असून विद्यापीठात उद्योजकता या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस आणि आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (ईडीआयआय) यांच्यामध्ये करार  झाला असून विद्यापीठात उद्योजकता या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि 'ईडीआयआय'चे संचालक मंडळ सदस्य मिलिंद कांबळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर , एसपीपीयू रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, 'ईडीआयआय'चे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला, आदी उपस्थित होते. 

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर

द्योजकतेला वाव देऊन नवीन उद्योजक तयार करण्यासाठी इनक्यूबेशन सेंटरने  'डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट' हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हा १ वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम असेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचे शिक्षण दिले जाईल. 

'ईडीआयआय'चे प्राध्यापक आणि विद्यापीठातील प्राध्यापक मिळून या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या पदविका अभ्यासक्रमाबरोबरच उद्योजकता या विषयावरील आणखी काही छोट्या कालावधीचे अभ्यासक्रमसुद्धा सेंटरतर्फे सुरु होणार आहेत. 

Breaking : अखेर 'टीईटी'चा निकाल जाहीर; 'इतके' शिक्षक ठरले पात्र
 
'आत्मनिर्भर भारत" अभियानानुसार आम्ही उद्योजकतेच्या माध्यमातून इतरांसाठी रोजगार निर्माण करण्यावर भर देत आहोत. त्या उद्दीष्टाने हा विशिष्ट डिप्लोमा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
- डॉ.  नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

'ईडीआयआय'ने अहमदाबाद आणि जम्मू येथील 'आयआयएम' सोबत करार केला आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठासोबत करार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. . या काळात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, टीचिंग ट्रेनिंग यासारखे उपक्रम राबविण्याचे आमचे नियोजन आहे. 
- डॉ. सुनील शुक्ला, महासंचालक, ईडीआयआय

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneur Diploma started by Pune University for student