उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hukmichand Chordia

उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन

कात्रज - प्रविण मसालेचे संस्थापक उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचे निधन झाले. सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात त्यांचा १९३० मध्ये जन्म झाला होता. लहानपणी त्यांची गांधीवादी म्हणून ओळख होती. गांधी विचारांचा त्यांचावर पगडा होता. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले हुकमीचंद यांना त्यांच्या पत्नी कमल यांनी मसाले विकण्याची कल्पना सांगितली होती. त्यातून कोट्यवधी रुपयांचा उद्योग त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने उभा केला. त्याला वाढवलं घराघरात प्रविण मसालेची एक ओळख निर्माण केली.

१९६२ मध्ये चोरडिया यांनी प्रविण मसालेची स्थापना केली होती. मारवाडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला असला तरी अस्सल महाराष्ट्रीयन तडका असलेले मसाले बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. सोबत, मांसाहारी जेवणासाठी लागणारे मसाले त्यांच्याकडे उत्पादित केले जात होते. प्रविण मसालेवाले यांच्या मसाल्याची चव महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचली असून महाराष्ट्रासोबत देशाच्या वेगवेगळ्या भागात विक्री केली जाते.

चोरडिया यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हुकमीचंद यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाठीमागे राजकुमार, डॉ. प्रविण, प्रदीप, धन्यकुमार अशी चार मुले, सूना, नातवंडे, असा परिवार आहे. शिरवळ येथे साकारत असलेल्या चोरडिया इंडस्ट्रिअल पार्कचे संस्थापक प्रदीप चोरडिया यांचे ते वडील होत.

Web Title: Entrepreneur Hukmichand Chordia Passes Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top