स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजकांना संधी

बाबा तारे
शनिवार, 30 जून 2018

औंध (पुणे) : बाणेर-बालेवाडी-पाषाण-औंध परिसरातील विविध नविन जुन्या उद्योजकांना स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातुन आपल्या उद्योगांचा विकास करण्याची नुकतीच संधी मिळाली.या परिसरातील नागरीकांमध्ये उद्योजकीय वृत्तीची वाढ व्हावी यासाठी औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रवि घाटे यांच्या संकल्पनेतुन शंभर दिवसांचा मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केला गेला आहे."स्मार्ट सिटी स्मार्ट, स्टार्टअप या उपक्रमाच्या माध्यमातुन निश्चीतच या परिसरातील नागरीकांमध्ये प्रामुख्याने युवा पिढी उद्योजकतेकडे वाटचाल करेल व या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांना उद्योग ज

औंध (पुणे) : बाणेर-बालेवाडी-पाषाण-औंध परिसरातील विविध नविन जुन्या उद्योजकांना स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातुन आपल्या उद्योगांचा विकास करण्याची नुकतीच संधी मिळाली.या परिसरातील नागरीकांमध्ये उद्योजकीय वृत्तीची वाढ व्हावी यासाठी औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रवि घाटे यांच्या संकल्पनेतुन शंभर दिवसांचा मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केला गेला आहे."स्मार्ट सिटी स्मार्ट, स्टार्टअप या उपक्रमाच्या माध्यमातुन निश्चीतच या परिसरातील नागरीकांमध्ये प्रामुख्याने युवा पिढी उद्योजकतेकडे वाटचाल करेल व या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांना उद्योग जगताकडे वळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली असल्याचे" नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले.  

तसेच "अशा उपक्रमांमधुन नविन उद्योजकांना प्रेरणा मिळणार असुन त्यांच्या नवनविन कल्पनांमधून उभारीस येणारे उद्योग हे सामाजिक दृष्ट्या महत्वाचे असतील व देशाच्या विकासात नक्कीच हातभार लावतील असा विश्वास वाटतो तसेच स्मार्ट सिटी संकल्पनेत त्यांच्या कल्पनांचा व उद्योजकांचा निश्चितच समावेश करुन घेऊ"असे आश्वासन स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंन्द्र जगताप यांनी दिले. भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करत स्टार्टअपचे स्वप्न मनी बाळगणाऱ्या नवं उद्योजकांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या "पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्टअप साठी तयार केलेले पोषक वातावरण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.राज्यातील केवळ दहा शहरेच स्मार्टसिटी होण्या पेक्षा सर्व महानगरपालिका, गावे स्मार्ट झाली पाहिजेत व असे उपक्रम सर्वत्र राबवले गेले पाहिजेत." या शिबिरास याभागातील एकशे अठ्ठावीस उद्योजकांना पहिल्या टप्प्यात संधी दिली गेली असुन यामार्फत त्यांना उद्योग वाढीसाठी लागणारे मार्गदर्शन, जाहिरात यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा प्रवक्या श्वेता शालिनी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे राजेंद्र जगताप, यांच्यासह संयोजक रवि घाटे, मंदार राराविकर, शिशिर तरळ, अभय बागल, श्रीअय्यर व परिसरातील बहुसंख्य उद्योजक व नागरीक उपस्थित होते.

Web Title: entrepreneurs got opportunity in startup