पर्यावरण दिंडी संपन्न

रमेश मोरे
सोमवार, 16 जुलै 2018

रिमझिम पावसाची संततधार... विठु नामाबरोबर पर्यावरण वाचवा संदेश फलक हाती घेवुन निघालेल्या भक्तिमय वातावरणात जुनी सांगवी येथील नृसिंह हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न झाली.
 

जुनी सांगवी- रिमझिम पावसाची संततधार... विठु नामाबरोबर पर्यावरण वाचवा संदेश फलक हाती घेवुन निघालेल्या भक्तिमय वातावरणात जुनी सांगवी येथील नृसिंह हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न झाली.

संपुर्ण जगाला शांती, प्रेम व भक्तीचा संदेश देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वृक्ष, वेली, पशु पक्षी यांचे महत्व सांगीतले आहे. याची जाणीवेतुन नृसिंह हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने पर्यावरण दिंडी काढण्यात आल्याचे प्राचार्य सुरेंद्रनाथ वरूडे यांनी सांगीतले.

टाळ, मृदंगाच्या गजरात पारंपारीक संतांच्या वेशभुषा व पोषाखात सांगवीतील प्रमुुख रस्त्यावरून ही दिंडी काढण्यात आली. शाळा व महाविद्यालयाचे प्रमुुख विश्वस्त एकनाथ ढोरे,बी.एस.पाटील,शामराव कदम नगरसेविका माई ढोरे उपस्थित होते.

Web Title: Environment Dindi Finished