पुणे - गोपाळकृष्ण शाळेत पर्यावरण दिंडी आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे : गोखलेनगरमधील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
ही पर्यावरण दिंडी शालेय परिसरातून विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी मुलांनी पर्यावरण जर प्रदूषणमुक्त ठेवायचे असेल तर आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावा हा संदेश दिला.

एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष, एक दोन तीन चार झाडे लावू भरमसाट, झाडे एक फायदे अनेक , वृक्ष लावा पाऊस वाढवा , वृक्ष बोले माणसाला नका बोलू आम्हांला ,जेथे झाडे उदंड तेथे पाऊस प्रचंड , होऊ आपण सर्व एक लावू रोपे अनेक अश्या घोषणा व विठू नामाचा गजर मुलांनी पर्यावरण दिंडीत करून अवघा परिसर दुमदुमून सोडला.पर्यावरण दिंडीला पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ०७ चे नगरसेवक आदित्यजी माळवे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यापालखी सोहळ्याचे नियोजन रणजित बोत्रे व विशाल चव्हाण यांनी केले. स्वाती वाळके यांनी अभंग गायिले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार, गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे उपस्थित होत्या.

Web Title: environment dindi at gopalkrishna school