कदमस गुरुकुल संस्थेला पयार्वरण मित्र पुरस्कार प्रदान

Environment
Environment

भिगवण - मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे शुध्द पाणी, शुध्द हवा कुठे मिळेल असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. पाणी, हवा, ध्वनी यांच्या प्रदुषणाबरोबरच मनाचेही मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण झाल्यामुळे माणुस हा आत्मकेंद्री बनला आहे. प्रदुषणांमुळे मानवी जीवन मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. पाणी, हवा व ध्वनी प्रदुषण कमी करण्याबरोबर मने शुध्द करण्याचा प्रयत्न केल्यास पर्यावरणाची हानी रोखण्यास मदत होईल असे मत इंदापुरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.  

येथील नेचर फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पयार्वरण मित्र पुरस्कार 2018 चे वितरण इंदापुरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांचे हस्ते इंदापुर येथील डॉ. कमदस् गुरुकूल या संस्थेस प्रदान करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय चौधरी,नामदेव कुदळे, डॉ. अजय थोरात, थॉमस मथाई, डॉ. शैलेश दोशी व नेचर फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. एल.एस. कदम, गुलाबचंद नगरे व सदस्यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी पाणी फाऊंडेशन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल सिध्देश्वर निंबोडी ग्रामपंचायतीचा तर डॉक्टरेट पदवीबद्दल डॉ. काशीनाथ सोलनकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री. पाटील पुढे म्हणाले, येथील नेचर फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाची करण्यात येत असलेले प्रयत्न हे भावी पिढ्या सुरक्षित करण्याचा अल्पसा प्रयत्न आहे या प्रयत्नाला समाजाने साथ द्यावी. 

डॉ. कदम म्हणाले, पयार्वरणाच्या होत असलेल्या हानीमुळे दुष्काळ अतिवृष्टी असे गंभीर प्रश्न निमार्ण होऊ लागले आहेत. पयार्वरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी आहे म्हणून हात झटकून न टाकता प्रत्येकाने गाभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. डॉ. कदमस् गुरुकुलमध्ये हजारो वृक्षांची लागवड करुन जोपासणा केली आहे. शालेय विदयार्थ्यांना वृक्षारोपनाचे व पर्यावरण संरक्षणाचे महत्व पटवुन देण्याचा प्रयत्न आहे. पर्यावरण मित्र पुरस्काराने आणखी प्रोत्साहन मिळेल. सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड म्हणाले, नेचर फाऊंडेशनने भिगवण व परिसरामध्ये वृक्षारोपनाची चळवळ उभी केली आहे व या संवेदनशील विषयाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संजय चौधऱी म्हणाले, पयार्वरण संरक्षण व संवधर्न हे खुप मोठे काम आहे ते कोणतीही एक व्यक्ती किंवा संस्था करु शकणार नाही. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणार्या व्यक्ती व संस्थाना प्रोत्साहन मिळावे त्यांचा पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन नेचर फाऊंडेशनच्या वतीने सन्माम करण्यात येतो. यावेळी रंजना आघाव, डॉ. काशीनाथ सोलनकर, डॉ. पद्ममा खरड, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुभाष फलफले, कमलेश गांधी, नंदकुमार आग्रवाल, नंदकुमार धांडे, डॉ. दादा जगताप, यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय चौधरी यांनी केले सुत्रसंचालन डॉ. प्रशांत चवरे व रियाज शेख यांनी केले पुरस्काराचे वाचन डॉ. जयप्रकाश खरड यांनी केले तर आभार संपत बंडगर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com