पर्यावरणासाठी नदी स्वच्छता हवी - महापौर राहुल जाधव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत,’’ असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत,’’ असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्यातर्फे इंद्रायणी स्वच्छता अभियानासाठी घेतलेल्या रिव्हर सायक्‍लोथॉन जनजागृती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झाला, त्या वेळी महापौर जाधव बोलत होते. महापालिका शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अविरत श्रमदान संस्थेचे सचिन लांडगे, डॉ. नीलेश लोंढे, दिगंबर जोशी आदी उपस्थित होते.

बक्षीसप्राप्त शाळा
बक्षीसप्राप्त शाळांत अभिषेक इंटरनॅशनल स्कूल, आदर्श स्कूल, अनुराग स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, भैरवनाथ प्राथमिक विद्यालय, भारती स्कूल, भैरवनाथ विद्यालय सेकंडरी स्कूल, महात्मा फुले हायर सेकंडरी स्कूल, महात्मा फुले स्कूल, मास्टरमाइंड ग्लोबल स्कूल, मंजुरीबाई स्कूल, एम.जी.एम. स्कूल, मोतीलाल तालेरा स्कूल, नागेश्‍वर हायस्कूल, प्रियदर्शनी स्कूल भोसरी, प्रियदर्शनी स्कूल इंद्रायणीनगर, प्रियदर्शनी स्कूल मोशी, प्रियदर्शनी सी.बी.एस.ई. स्कूल, रामचंद्र गायकवाड स्कूल, समता माध्यमिक स्कूल, संत ज्ञानेश्‍वर स्कूल, संत साई स्कूल, सेठ रामधारी रामचंद्र आगरवाल स्कूल, श्रमजीवी स्कूल, श्रीराम विद्यामंदिर, सिद्धेश्वर इंग्लिश माध्यम स्कूल, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, एस.जी.पी. इंटरनॅशनल स्कूल, सेंट अँथोनी स्कूल, स्टरलिंग स्कूल, स्वामी समर्थ- सेमी इंग्लिश स्कूल, श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल, लालबहादूर शास्त्री विद्यालय, यशवंतराव चव्हाण स्कूल, गायत्री स्कूल मोशी, मॅटरिक्‍स सीबीएसई स्कूल, डुडूळगाव प्राथमिक विद्यालय, होरीझन स्कूल, श्रमिकनगर प्रायमरी स्कूल, सोनवणे वस्ती स्कूल, अजंठानगर बॉईज स्कूल, लांडेवाडी उर्दू स्कूल, विद्यावर्ती विचार इंग्लिश स्कूल, यशवंतराव चव्हाण गर्ल्स स्कूल, चोविसावाडी प्राथमिक शाळा, बोपखेल प्राथमिक शाळा, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा, पिंपरी वाघेरे प्राथमिक शाळा आदींचा समावेश आहे. 

Web Title: Environment River Cleaning Rahul jadhav