पर्यावरण संवर्धनासाठी दिल्ली-पुणे सायकल प्रवास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पुणे - दिल्ली ते पुणे असे सुमारे दीड हजार किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करून स्वानंद ग्रुपने पर्यावरण संवर्धनाच्या प्रसाराची मोहीम शुक्रवारी यशस्वी केली. या उपक्रमात नगरसेवक सनी निम्हण, शिवराज मानकर, मनोज शहा, मनोज मेहता आणि राजीव शहा सहभागी झाले.

पर्यावरण संवर्धनाचा प्रसार करण्यासाठी ग्रुपतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. महापौर प्रशांत जगताप, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दिल्ली येथील इंडिया गेट ते सवाई माधोपूर, कोटा, उज्जैन, शिरपूर, मनमाड, संगमनेरमार्गे पुण्याच्या शनिवारवाड्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.

Web Title: Environmental conservation Delhi-Pune cycling journey