सायकल फेरीतून पर्यावरणाचा संदेश

cycle
cycle

हडपसर - शहरातील स्पर्धा परिक्षा देणारे विदयार्थी आठवडया भराचा अभ्यासाचा शिण घालविण्यासाठी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी दर रवीवारी सायकल फेरी काढतात. पुण्यातील निसर्गरम्य परिसर, मंदिर, शहरात जे पर्यावरण विषयी उपक्रम चालतात तेथे ते मदत करून खारीचा वाटा उचलतात. यातून सायकलप्रेमी ग्रुप स्थापन झाला आहे. सायकल फेरीची सुरवात शनिवार वाडयापासून सुरवात होते. दर रविवारी २५ ते ३० किलोमिटरचा सायकल प्रवास हे विदयार्थी करतात. या ग्रुपमध्ये शहरातील विविध भागातील विदयार्थ्यांबरोबरच विविध जिल्हयातील विदयार्थ्यांचा समावेश आहे. 

ग्रुपचे सदस्य किसन ताकमोडे म्हणाले, आमचा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांचा ग्रुप आहे. आठ दिवस अभ्यास करून कंटाळा येतो. आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो की आपला मनातील ताणतणाव निघून जातो. त्यामुळे मन एकदम फ्रेश होऊन पुन्हा अभ्यास करायला 8 दिवस पुरेल ऐवढी ऊर्जा व प्रेरणा मिळत असते. त्याबरोबर अनेक मित्रांच्या ओळखी होतात. आमच्या ग्रुपमध्ये सर्व वयोगटातील मित्र आहेत. त्यांचा ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा होत असतो. सर्व मित्र वेगवेगळ्या अभ्याशिकेतील आहोत. त्यामुळे दर रविवारी भेट होतेच प्रत्येकाला खुशाली समजते. पुण्यात व लगतच्या परिसरात विविध ठिकाणी सायकल वरून जाऊ तो भाग पाहन्यात एक वेगळाच आनंद आहे. आमही ऐतिहासिक ठिकाणा ला भेट देत असतो. प्रत्येक सायकल फेरफटका चा अनुभव वेगवेगळ्या स्वरूपचा आहे .सायकल फेरफटका मधून जास्तीत जास्त सायकलप्रेमी - सायकल मित्र तयार व्हावे म्हणून प्रयन्न केला जातो. त्यामुळे पर्यावरण वाचण्यासाठी थोडी फार मदत होते.

ग्रुपमधील सदस्य वृक्ष संवर्धनासाठी काम करणा-या व्यतींना भेटतात. त्यांचा उपक्रमाला सायकलवरून जावून भेट देऊन त्यांचा बरोबर श्रमदान करतात. त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी एक नवीन उर्जा आणि प्रेरणा मिळते. सायकल फेरफटका मधून सम विचारी मित्र मंडळी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचे काम केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com