स्वप्न पर स्क्‍वेअर फूट : स्वप्नवत वारीवन प्रकल्प

episode 3 of Swapna Per Square feet
episode 3 of Swapna Per Square feet

वारीवन एपिसोड 3

पुणे : श्रीखंडे कुटुंबाला नवीन घर घ्यायचं आहे. जिथे आजूबाजूला हिरवळ असेल, वाहणारे धबधबे, झरे असतील, जमिनीवर उतरणारे ढग असतील, निसर्गाचा प्रेम ओतप्रोत भरलेलं असेल, अगदी हॉलिडे होमसारखं वातावरण असेल. इतकेच नाही तर ज्यात आधुनिक सुविधा असतील, ट्रॅफिक कमी असेल, कनेक्‍टिविटी सोप्पी असेल, इतके सगळं सेकंड होम म्हणून नाही तर फर्स्ट होम म्हणून हवं आहे ते ही शहरात. म्हणजे अगदी चंद्राचा हट्ट धरण्यासारखेचं नाही का? हा चंद्र देण्याचे आव्हान स्वीकारले आपल्या "स्वप्न पर स्क्वेअर फूट'चे निवेदक पुष्कर श्रोत्री याने.

एकूण 247 एकरांमध्ये दिमाखात उभ्या होणाऱ्या वारीवन प्रकल्पात श्रीखंडे कुटुंबाला हवं असणार सर्व काही आहे. म्हणूनच एकमेव अशा चंद्राप्रमाणे वारीवन हे एकमेव नाव या कुटुंबाला सुचवण्यात आलं. या घराच्या शोधात श्रीखंडे फॅमिली पोचली 25 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फरांदे स्पेसेसच्या वारीवन प्रोजेक्‍टवर. ज्यांचे चीफ मॅनेजिंग डायरेक्‍टर अनिल फरांदे आणि मॅनेजिंग डायरेक्‍टर आकाश फरांदे आहेत.

वारीवन टाऊनशिप ही तळेगाव, चाकणसारख्या इंडस्ट्रीअल एरिया आणि हिंजवडीसारख्या आयटी पार्कजवळ असून, मुंबई- पुणे महामार्गाशी कनेक्‍टेड आहे. सात एकरचा गोल्फ कोर्स असलेला वारीवन हा फर्स्ट होम विला कम्युनिटी आहे. अतिशय सुंदर, लक्‍झरियस आणि सर्व अमिनिटीजने युक्त अशा वारीवन प्रकल्पात 3 बीएचके ट्विन व्हिला आणि 4 बीएचके इंडिपेंडंट व्हिला उपलब्ध आहेत. शिवाय, येथे ऍम्फी थिएटर, सीनियर सिटीझन गार्डन, बटरफ्लाय गार्डन, फ्लॉवर गार्डन अशा निसर्गाच्या जवळ नेणाऱ्या खूप गोष्टी आहेत. भविष्यात या इन्टिग्रेटेड टाऊनशिपमध्ये कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स, शॉपिंग मॉल, इंटरनॅशनल स्कूल, हेल्थ आणि सोशल नीड्‌स पूर्ण करणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील.

साम टीव्हीवर पाहा..
श्रीखंडे फॅमिलीला हवा असणारा चंद्र हा वारीवनमध्ये भेटणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा, अद्‌भुत क्रिएटिव्ह निर्मित "स्वप्न पर स्क्वेअर फूट' रविवारी सकाळी 11.30 वाजता आणि बुधवारी दुपारी 3.30 वाजता फक्त साम टीव्हीवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com