पुणे : जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता होणार कमी; कारण...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

- जुन्नर तालुक्यातील ओझर येथे सुसज्ज कोविड केअर सेंटर 

- तालुक्यातच मिळणार उपचार

पुणे : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील ओझर येथे २०० बेडचे (खाटांचे) सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. हे सेंटर आजपासून (ता.२४) कार्यान्वित होणार आहे. यामुळे जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांना आता तालुक्यातच उपचार मिळणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जुन्नर तालुक्यातील ओझर गणपती देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने हे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये जिल्हा परिषदेचे आठ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

COVID 19

या ठिकाणी संशयित कोरोना रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर येथेच उपचार केले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, याआधी लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या यात्री सभागृहात ३०० बेडचे (खाटांचे) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे जुन्नर तालुक्यात आता ५०० खाटांची सोय उपलब्ध झाली असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Equipped COVID Care Center at Ojhar in Junnar taluka Pune