esakal | वळसे पाटलांच्या आदेशाने पाबळमध्ये सुसज्ज कोविड सेंटर; गुढीपाडव्याला शुभारंभ

बोलून बातमी शोधा

pabal

सदर सेंटर गुढीपाडव्याचे औचित्य साधून मंगळवारी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. 

वळसे पाटलांच्या आदेशाने पाबळमध्ये सुसज्ज कोविड सेंटर; गुढीपाडव्याला शुभारंभ
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिक्रापर : पाबळ-केंदूर (ता.शिरूर) भागासाठी मोठी आरोग्य सुविधा ठरु शकणा-या पाबळ ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड सेंटर हे उद्या मराठी नववर्षारंभाचे दिवशी मंगळवारी (ता.१३) सुरू करण्याचा निर्णय नुकताच झाला. राज्याच्या गृहमंत्रीपदी नव्याने पदभार स्विकारलेले दिलीप वळसे-पाटील यांच्या सुचनेने हा निर्णय झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिली. शिरूरच्या पश्चिम पट्याला आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरु शकणा-या पाबळ ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून सहा महिन्यांपूर्वी  इमारतीमध्ये तात्पूरते कोविड सेंटर सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झाली नव्हती. सध्याच्या काळात मात्र पुन्हा कोविड परिस्थिती गंभीर झाल्याने प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या सुचनेनुसार नुकतीच या सेंटरची पाहणी केली. त्यानुसार सदर सेंटर गुढीपाडव्याचे औचित्य साधून मंगळवारी सुरू करण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

दरम्यान सदर पाहणीवेळी जिल्हापरिषद सदस्या सविता बगाटे, बाजार समितीचे संचालक मानसिंग पाचुंदकर, माजी सभापती विश्वास कोहकडे, सरपंच मारुती शेळके, सोपान जाधव, अरूण चौधरी, मंडलाधिकारी राजेंद्र आळने, तलाठी डी. आर. बोरा, संजय नर्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान सध्या पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर मेसाई, केंदूर, आदी भागांतील रुग्णांना मलठण अवसरी, खेड या ठिकाणी कोवीड-उपचारांसाठी जावे लागतेय. याच पार्श्वभूमीवर या रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करुन मंगळवारी कोविड सेंटर सुरू करुन रुग्णांना इथेच जेवणाच्या सुविधेसह या सुविधेचा प्रारंभ करण्याचा निर्णय झाल्याचे श्री पाचुंदकर यांनी सांगितले. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टाफ मंजुरीसाठीही आम्ही प्रयत्नात : पवार-पाचुंदकर
पाबळ ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी त्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी आदींची प्रशासकीय मंजुरी नसल्याची बाब वळसे पाटील यांचेपर्यंत पोहचवलेली आहे. सध्याचा कोरोनाचा गंभीर काळ दूर होताच आम्ही स्वत:हून जाऊन सदर अधिकारी-कर्मचारी स्टाफची मंजुरी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडून घेणार असल्याचे माजी सभापती प्रकाश पवार व पाचुंदकर यांनी सांगितले.