विज्ञानाचा दुरुपयोग वैद्यकीय क्षेत्रात नसावा : प्रा. अरुण तिवारी

arun tiwari sakal
arun tiwari sakal

पुणे : "विज्ञानाच्या आजवरच्या प्रगतीचा दुरुपयोग प्रामुख्यानं वैद्यकीय व इतरही क्षेत्रांमध्ये व्यापारी वृत्तीनं घडताना दिसून येत आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध सकारात्मक उपयोग होणं ही खरी काळाची गरज आहे", असं मत ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. अरुण तिवारी यांनी काल व्यक्त केलं. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे वैज्ञानिक सहकारी, त्यांच्या पुस्तकांचे सहलेखक व  त्यांची भाषणं तयार करून देणाऱ्या चमूतील महत्त्वाचे सदस्य असलेल्या प्रा. तिवारी यांनी काल 'सकाळ फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून  वाचकांशी काल संवाद साधला. नीला शर्मा यांनी त्यांना बोलतं केलं. 

डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वात विज्ञान व अध्यात्माचा अपूर्व मिलाफ होता असं सांगून तिवारी यांनी त्यांच्याबद्दलच्या  अनेक आठवणी जागवल्या. ते म्हणाले,
"डॉ. कलाम यांनी सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यातल्या वैद्यकीय सुधारणांचा ध्यास घेतला होता. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली , हृदयविकाराच्या उपचारांमध्ये   वापरले जाणारे स्टेंटस् अत्यल्प किमतीत  व पोलिओग्रस्तांसाठी सहायक ठरणारे कमी वजनाचे बूट उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पात सहभागी होता आलं. निरपेक्ष वृत्तीनं , सामाजिक हित  डोळ्यांसमोर ठेवून सदोदित कार्यरत राहणं व अंतरात्म्याशी संवाद साधणं हे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य आणि उन्नयनासाठी महत्त्वाचं आहे." असा मंत्र तिवारी यांनी या वेळी सांगितला. 

सकाळ प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या  'अ मॉडर्न इंटरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्स गीतारहस्य' या  इंग्रजी पुस्तकाच्या लेखनामागचा हेतू स्पष्ट करत तिवारी म्हणाले की, भगवद्गीतेतील विचार आजच्या समाजाला विविध समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. 

प्रा. तिवारी यांनी लिहिलेल्या 'अ मॉडर्न इंटरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्स गीता रहस्य' या सकाळ प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंग्रजी ग्रंथाविषयी त्यांना  नीला शर्मा यांनी बोलतं केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com