विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणण्यास कटिबध्द - रोहित पवार

संतोष आटोळे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

शिर्सुफळ | बारामती तालुक्यातील शिर्सुफळ- गुणवडी जिल्हा परिषद गटामध्ये खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच जिल्हा परिषद खाजगी कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर विकासानिधी आणला आहे.यामुळे जलसंधारण, रस्ते, पाणीयांसह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. तसेच उर्वरित कामांसाठी आगामी काळामध्ये अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहु अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.

शिर्सुफळ | बारामती तालुक्यातील शिर्सुफळ- गुणवडी जिल्हा परिषद गटामध्ये खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच जिल्हा परिषद खाजगी कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर विकासानिधी आणला आहे.यामुळे जलसंधारण, रस्ते, पाणीयांसह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. तसेच उर्वरित कामांसाठी आगामी काळामध्ये अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहु अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या निर्णयानुसार बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी जिल्हा परिषद गटातील शिर्सुफळ गणाची दुसरी प्रभाग समिती सभा कटफळ येथील जानाई मंदिराच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्या लिलाबाई गावडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, कटफळच्या सरपंच सारिका मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, गाडीखेलचे सरपंच बाळासाहेब आटोळे, सिध्देश्वर निंबोडीचे माजी सरपंच किशोर फडतरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी, तसेच कटफळसह शिर्सुफळ, पारवडी, सिध्देश्वर निंबोडी, साबळेवाडी, गाडीखेल, सावळ, जैनकवाडी, वंजारवाडी यागावांचे ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रत्येकालाच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीशी निगडीत कामांसाठी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य होईल असे नाही या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेकडुन गटातील मोठ्या गावांमध्ये प्रत्येक तीन महिन्यांनंतर प्रभाग सभा आयोजित करण्यात येत आहे.यामुळे गटातील लोकांचे प्रश्न त्यांच्याच भागात तात्काळ सुटण्यास मदत होत आहे. यावेळी पवार यांनी गणातील गावांमध्ये मंजुर झालेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच गटामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी, वीज, रस्ते या विषयांवरील आपापल्या गावात जाणवत असलेल्या समस्या उपस्थितांकडुन जाणुन घेतल्या. त्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडुन करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली.  

या बैठकीचे अहवाल लेखन मतदारसंघ बैठकीचे सचिव व विस्तार अधिकारी ए.के.खांडेकर यांनी प्रास्ताविक ग्रामसेवक सतिश बोरावके यांनी तर आभार भारत मोकाशी यांनी मानले.

गावपुढारी समस्यांमांडण्याबाबत उदासिन..
जिल्हा परिषद स्तरावर गावामधील समस्या सोडवण्यासाठी गावस्तरावरच अधिकारी उपलब्ध व्हावेत या उद्देशाने प्रभाग समिती बैठकांचे आयोजन केल जाते. मात्र शिर्सुफळ गणातील समाविष्ट असलेल्या गावांमधील गावपुढारीच गावच्या समस्या मांडण्याबाबत उदासिन असल्याचे या बैठकीच्या उपस्थित वरुन दिसुन येते. गणातील दहा गावांपैकी फक्त कटफळ व गाडीखेल या दोन गावचे सरपंचच या बैठकीला उपस्थित होते. तर प्रत्येक गावातील ग्रामसेवक तलाठी व इतर अधिकारी मात्र उपस्थित होते. यामुळे गाव विकासाला प्रशासनाला पुढाकार आहे परंतू गाव पुढाऱ्यांची उदासिनता असल्याचे पहायला मिळाले.याबाबत रोहित पवार यांनीही या गणातील बहुतांशी गावांना कोणत्याचा समस्या नसल्याचे दिसते असा उपरोधित टोला मारला. 

Web Title: esakal marathi news baramati rohit pawar news