पुणे | 'गाव तिथे ग्रंथालय'साठी रविवारी पुस्तक संकलन

Book-Donation
Book-Donation

'गाव तिथे ग्रंथालयासाठी' युवकांचा उपक्रम 

पुणे | ग्रामीण महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, वाचनसंस्कृती जोपासली जावी व गावागावातील ग्रंथालये ही केवळ वाचनकेंद्र न राहता गावाची शाश्वत विकासकेंद्र असावीत ह्या उद्देशाने टीम एकलव्य ने गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम हाती घेतला असून,ग्रंथालय उभारणी करिता पुस्तके संकलित करण्यासाठी 11 फेब्रुवारी (रविवार) रोजी,फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत पुस्तक संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

आपली जुनी, नवी शालेय तसेच अवांतर वाचनाची पुस्तके, ग्रंथालयास उपयुक्त असे फर्निचर,संगणक व जुनी वृत्तपत्रे व मासिकांची रद्दी देऊन योगदान द्यावे हे आवाहन टीम एकलव्य तर्फे करण्यात येत आहे.

टीम एकलव्य तर्फे जून महिन्यात पुण्यात पहिली पुस्तक संकलन मोहीम आयोजित करण्यात आली होती, त्यात पुणेकरांनी पुस्तकांच्या स्वरूपात भरभरून योगदान दिले.त्यानंतर यवतमाळ, औरंगाबाद, अमरावती, अहमदनगर,  मुंबई व ठाणे शहरांत घेण्यात आलेल्या मोहिमेत जवळ जवळ 30 हजार पुस्तके संकलित झाली असून याच पुस्तकांच्या माध्यमातून  महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी, तिरझडा, तरोडा, धानोरा, तीवरंग, किन्ही, अर्जुना, प्रधानवोरी,  परसोडी बुद्रुक, आकपुरी, वडगाव पोलीस ठाणे, देवनाळा, कुऱ्हा तळणी, पाग्राट गोळे, बोरगाव कडू व वर्धा जिल्यातील हिरापूर, गिरोली, गिडोह, वाटखेडा, लोणी, सोनोरा (ढोक), भिडी, पळसगाव सह एकूण 25 गावामध्ये ग्रंथालये उभी करण्यात टीम एकलव्यला यश आले आहे.

पुणे जागृती ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाचे हे दशकपूर्ती वर्ष असून गरीब-गरजू लोक, अनाथाश्रम व ऊसतोड कामगारांना कपडे पुरवण्यासाठी आपल्याकडील जुने सुस्थितीत असलेले व नवे कपडे दान करण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे. त्यासाठी पुस्तक संकलन मोहिमेसोबतच कपडे संकलन मोहीम पण आयोजित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com