टाकवे बुद्रुक | मावळ तालुक्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

टाकवे बुद्रुक : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार आणि स्थानिक नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे मावळ तालुक्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कान्हे टाकवे बुद्रुक औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याने स्थलांतरित होत आहे, त्यामुळे कामगार देशोधडीला लागले असून युवकांच्या हाताचे काम गेले आहे, त्यांच्यावर आलेल्या उपासमारीला जबाबदार कोण? असा प्रश्न पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केले.

या परिसरातील कारखानदारांनी आपला गाशा गुंडाळून दुसरीकडे कारखाने उभारले आहे, त्यामुळे स्थानिकांचा रोजगार बुडला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बेरोजगार कामगारांनी येथे बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी नेवाळे यांनी भाजप सरकारसह स्थानिक नेतृत्वाला टीकेचे लक्ष्य केले. नेवाळे म्हणाले," तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कान्हे - टाकवे बुद्रुक औद्योगिक क्षेत्र उभारले आहे. त्यात अनेक कंपन्या देखील सुरु आहे. रोजगार मिळाल्याने स्थानिकांच्या जीवनमानात,राहणीमानात मोठा बदल झाला होता. औद्योगिक क्षेत्राला  २०१४ पासून घरघर लागली. त्यात अनेक वर्षांपासून कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूल, कान्हे - टाकवे बुद्रुक रस्त्याचे रुंदीकरण, सतत होणारी  वाहतूक कोंडी,  इंद्रायणी नदीवरील धोकादायक पुल,त्यावर अवजड वाहतूक रोखल्याने कंपनी अवजड वाहनांना मज्जाव केला आहे. पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात असल्याने अनेक वेळा संपर्क तुटल्याने माल वाहतुकीवर परिणाम होतो.  या क्षेत्रातील अनेक कारखाने दिवसेंदिवस स्थलांतरित होत असल्याने युवकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे.

त्यात केंद्र व राज्य शासनाचे कामगार विरोधी कायदे केल्याने कामगार देशोधडीला लागला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबाची अवहेलना होत आहे. त्यात ठेकेदार पद्धतीने हजारो कामगार असून अचानक त्यांना कमी करण्याचे प्रकार होत आहेत. त्यांच्या हाताला काम न मिळाल्यास हे बेरोजगार गुन्हेगारीकडे वळतील. केवळ केंद्र व राज्यातील भाजप सरकार तसेच स्थानिक आमदार यांच्या दुर्लक्षामुळे कामगार देशोधडीला लागत आहे. राजकीय इच्छाशक्ती असती तर मावळातील एकही कंपनी स्थलांतरित झाली नसती. या घटनेला भाजप सरकार जबाबदार आहे.अशा एकापेक्षा अधिक प्रश्नांची सरबत्ती उडवीत त्यांनी सरकारला धारेवर धरले. स्थानिक कामगारांच्या प्रश्ना बाबत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: esakal marathi news maval industry worker news