कौमार्य चाचणी प्रथे विरोधात जनजागृती करणाऱ्यांना मारहाण

संदीप घिसे 
सोमवार, 22 जानेवारी 2018

प्रशांत इंद्रेकर (रा.येरवडा, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा आहे.

पिंपरी: लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा कंजारभाट समाजात आहे. या प्रथेच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या तरूणांना मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे रविवारी (ता.२१) रात्री घडली.

प्रशांत इंद्रेकर (रा.येरवडा, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा आहे. या प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विवेक तामचीकर आणि प्रशांत इंद्रेकर आणि त्यांच्या साथीदारांनी "Stop The vritual"  व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवरून वेळोवेळी जनजागृती केली आहे.

 इंद्रेकर व त्याचे कुटूंबीय एका विवाहासाठी पिंपरीत आले होते. त्यावेळी एका टोळक्याने त्यांना घेरले. तू समाजाच्या प्रथेला विरोध करतोस का? असे म्हणत इंद्रेकर व त्यांच्या कुटूंबियांस मारहाण करण्यात आली.

Web Title: esakal marathi news pimpri chinchwad awareness virginty test activist beaten up