बाणेर परिसरात संगणक अभियंत्याची कुटूंबासह आत्महत्या

बाबा तारे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औंध (पुणे) - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरात एका फ्लॅटमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. पती संगणक अभियंता असून, त्याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

औंध (पुणे) - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरात एका फ्लॅटमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. पती संगणक अभियंता असून, त्याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पती जयेशकुमार पटेल (वय ३४), पत्नी भूमिका पटेल (वय ३०) आणि नक्ष पटेल (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. अभियंता जयेशकुमार पटेल हे महिना दीड लाख पगारावर क्युलॉजी या आयटी कंपनीत नोकरीस होते. तर, पत्नी भूमिका ही गृहिणी होती. कालपासून त्यांचे घर आतून बंद होते. जयेशकुमार यांचे मित्र त्यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शेजार्‍यांनी रात्री पोलिस नियंत्रण कक्षात कळविले. चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा आतून बंद असल्याने आत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिस दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून पटेल यांच्या घरात शिरले. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना कुटुंबातील सर्वजण मृतावस्थेत आढळून आले. पती-पत्नीच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसत आहेत. त्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. ही आत्महत्या आहे की नाही याचा खुलासा शवविच्छेदानंतरच कळू शकेल. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले.

पटेल कुटूंबियांचे शेजारी असलेले सुदिप्त रथ यांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी सांगितले, 'आमच्या शेजारी हे पटेल कुटुंब दिवाळीत राहायला आले होते. आमच्या जास्त संपर्कात नसले तरीही त्यांचा मुलगा आमच्या चार वर्षीय मुलीसोबत खेळायला यायचा. आता काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा नक्ष आजारी होता. परंतु एकूणच ही घटना ऐकूनच आम्हाला तर खुप मोठा मोठा धक्का बसला आहे. या बसंत बहार सोसायटीत सगळी उच्चपदस्थ रहिवासी राहतात. परंतु पटेल कुटूंबाचे असे काही होईल हे स्वप्नातही वाटले नाही. एकूणच आमच्या सगळ्यांना याबद्दल धक्का बसला आहे.'

Web Title: esakal marathi news pune it employee family found dead suicide case