पुणेकरांनो, बोला पार्किंग शुल्कावर !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

तुमच्या सूचना खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा editor@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

पुणे- पुण्याच्या पार्किंग धोरणावर महापालिकेत जोरदार चर्चा झडली आणि पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला. शहरात पार्किंग सशुल्क असावे की मोफत हा कायम वाद-विवादाचा विषय ठरला आहे. बरेच लोक सशुल्क धोरणाला विरोध करणारे आहेत, तर पार्किंग सशुल्कच असावे या मतांचेही लोक आहेत. खरंच, आम पुणेकरांना या विषयांवर काय वाटते ?

लिहा खालील प्रतिक्रियांच्या रकान्यात - सशुल्क हवे की मोफत अन्‌ त्यामागील तुमचा विचार काय? 

त्यापूर्वी देशभर पार्किंगचे काय दर आहेत याची माहिती वाचा :
दिल्ली विमानतळ : दुचाकी रू. 20, चारचाकी रू. 180 
पुणे विमानतळ : दुचाकी 25, चारचाकी 100 
मध्यवर्ती बंगळूर : दुचाकी 20, चारचाकी 90 
मध्यवर्ती मुंबई : दुचाकी 15, चारचाकी 60 
दक्षिण दिल्ली : दुचाकी 10, चारचाकी 20 
उत्तर दिल्ली : दुचाकी 10, चारचाकी 10 
कोलकता : दुचाकी 5, चारचाकी 10 
ई स्क्वेअर मल्टिप्लेक्‍स, पुणे : दुचाकी 20, चारचाकी 40

तुमच्या सूचना खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा editor@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

Web Title: esakal marathi news pune news parking charges