सृजन देशपांडे याचे 'स्पेल बी' स्पर्धेत यश 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

पुणे | मार्स संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय 'स्पेल बी' स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीची अंतिम फेरी नुकतीच 28 जानेवारीला बंगळुरू येथे झाली. या स्पर्धेच्या कॅटेगरी-4 मध्ये पुण्याच्या अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी सृजन देशपांडे याने चमकदार कामगिरी करत पहिल्या विसात स्थान पटकावले. 

या यशाबद्दल सृजनला मार्स संस्थेकडून बडिंग स्टार ट्रॉफी, स्पर्धेतील सहभागाबद्दलची ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा वेगवेगळ्या पातळ्यांवर मुलांचे इंग्रजीतील प्राविण्य आजमावते. स्पेल इट राऊंडमध्ये संगणकावर एकाच शब्दाचे वेगवेगळे स्पेलिंग दाखवण्यात येतात. त्यातून अचूक स्पेलिंग ओळखायचे असते. पहिल्या पाच शब्दांनंतर पुढचा प्रत्येक शब्द नॉक आऊट असतो. दुसऱ्या राऊंडमध्ये संगणकावर एक शब्द दाखवतात. त्या शब्दाचा एक समानार्थी आणि एक विरुद्धार्थी शब्द आणि त्याचे अचूक स्पेलिंग सांगायचे असते. सेगमेंटल्स राऊंडमध्ये शब्दाच्या अधोरेखित भागाचा फोनेटिक सिम्बॉल सांगायचा असतो. ओरल स्किल्स फेरीत ऐकवण्यात येणाऱ्या उताऱ्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्‍यक असते. 

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ, पंजाबसह देशभरातून मोठ्या संख्येने स्पर्धक आले होते. शालेय, आंतरशालेय, राज्य पातळ्यांवर यश मिळवत सृजनने राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. यात त्याने टॉप-20 मध्ये स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Web Title: esakal marathi news pune news school student news