सोशल मिडियामुळे 2 वर्षांपूर्वी हरवलेले वडील सापडले

social media help find father
social media help find father

केशवनगर : संध्याकाळची वेळ घरी जाण्याअगोदर गणपतीला मित्रांसोबत जाण्याचा बेत केशवनगर मधील एका तरुणाने केला. रस्त्यावरुन जाताना एका वयोवृद्ध व्यक्ती थंडीत कुडकुडत बसलेली दिसली. या अवस्थेत पाहून त्या वयोवृद्धाला तरुणाने विचारले, "आजोबा तुमचे नाव काय? तुम्ही कोठुन आलात ?" परंतु त्यांच्याकडुन सगळे प्रश्न अनुत्तरीच. यावर आजुबाजुला चौकशी केल्यावर समजले हे आजोबा केशवनगर भागात या ना त्या चौकात दोन दिवसांपासून फिरताना दिसत आहेत. त्यांना काहीच बोलता येत नव्हते. परंतु त्या आजोबांना काहीतरी सांगायचे होते. परंतु तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते. त्यावर या तरुणाने आजोबांना एक कागद व एक पान दिला. आजोबांनी थरथरत्या हातांनी कागदावर स्वतःचे नाव अहमद मन्यार असे लिहिले. व पत्ता कोठुरे, ता.निफाड असे लिहिल्यानंतर त्या तरुणाने मित्रांच्या मदतीने लगेच मोबाईलवर एक चित्रीकरण तयार केले. त्या चित्रीकरणामध्ये आजोबा कोण आहेत त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्याबद्दल कोणाला माहिती असेल तर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे व मदतीचे आवाहन केले. व हे चित्रीकरण सोशल मिडीयात फेसबुकवर व वॉट्सअॅपवर पुढे पाठविले. व त्या आजोबांना एक पांघरुण देऊन स्वतःच्या घरी नेले. त्या तरुणाचे नाव आहे प्रविण प्रधान. हा तरुण केशवनगरमधील रहिवासी आहे.    

त्या आजोबांची घरी सेवा केली. त्यांना खाऊ-पिऊ घातले. हे करत असतानाच केशवनगर भागातून हे चित्रीकरण संपूर्ण व्हायरल झाले. काही तासातच अनेक मित्रांचे व अनोखळी व्यक्तींचे फोन सुरु झाले. त्यातच एक फोन आला. तो फोन होता त्या आजोबांच्या एका नातेवाईकांचा. त्या नातेवाईकांकडून खातरजमा केल्यावर थेट त्या आजोबांच्या मुलाशी संपर्क साधला गेला. मुलाचे नाव होते चांदमिया अहमद मन्यार. चांदमियाची फेसबुकवर मेसेंजर व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या वडीलांसोबत भेट घडवुन दिली. मुलाने सांगितले की, हो हेच माझा वडील आहेत की जे दोन वर्षापूर्वी नाशिकमधून बेपत्ता झाले होते. मुलाने तत्काळ केशवनगर येण्याचा बेत केला. चांदमिया व त्याचे नातेवाईकांनी केशवनगर येऊन आपल्या दोन वर्षांपूर्वी हरवलेले वडीलांची गळाभेट घेतली. मन्यार कुटुंबीय आज ख-या अर्थाने कृतकृत्य झाले होते. त्यांनी या तरुण कार्यकर्ता प्रविण प्रधानचे मनोमन आभार मानले. याप्रसंगी विशाल प्रधान, शक्ती प्रधाने, राहूल प्रधान, चेतन प्रधान, नदाफ शेख उपस्थित होते.  प्रविण प्रधानच्या या कामगिरीमुळे प्रविणला केशवनगर-मुंढवा परिसरातून कौतुकाची थाप मिळाली आहे.   

यावेळी चांदमिया अहमद मन्यार म्हणाले, "गेल्या दोन वर्षापासून मी व माझे नातेवाईक आमच्या वडिलांनी शोधत होतो. पोलिसातही तक्रार केली होती. अनेक नातेवाईकांनी कळविले होते. पंरतु दोन वर्षापासून त्यांचा तपास काही लागला नाही.  एका नातेवाईकांचा फोन आला. तुझे वडील पुण्यात केशवनगरमध्ये सापडले आहेत. त्यांच्या या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. जेव्हा व्हिडीओ कॉलवर पाहिले. तेव्हा खुप आनंद झाला. मी या प्रधान कुटुंबियाचे मनापासून आभार मानतो. आज खऱ्या अर्थाने अजुनही माणुसकी जिवंत आहे असेच वाटते."   

प्रविण प्रधान म्हणाला, माणुसकीच्या नात्याने मी त्या आजोबांची विचारपूस केली. यात मला त्यांच्याबद्दल सहानूभूती वाटली. त्यांच्याकडुन जी माहिती मिळाली. त्यावर मी प्रयत्न केले. माझ्या प्रयत्नांना यश आले. माझ्या या कामात मला घरच्यांनी व मित्रांनी मदत केली.
   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com