ग्रामवन योजनेअंतर्गत वनस्पती लागवड

Tree plantation at supe
Tree plantation at supe


सुपे- आदर्शगाव पिंपरी गवळी (ता. पारनेर) येथील वनविभागाच्या सुमारे चार एकर क्षेत्रावर औषधी वनस्पती उद्यान तसेच रोपवाटिका व वन विभागाच्या आणि गायराणच्या काही जागेवर ग्रामवन योजनेअंतर्गत विविध वनस्पतींची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपवन संरक्षक ए.लक्ष्मी यांनी दिली. 

पिंपरी गवळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने वन जमिनीचा विकास करावयाचा आहे. या वन विभागाच्या जागेची पाहणी करण्यासाठी ए. लक्ष्मी येथे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. सहाय्यक वनसंरक्षक संजय कडू, सरंपच व भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख अश्विनी थोरात, डी. एन. थोरात, पारनेरचे वन परिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे, धनंजय थोरात, वनपाल रोकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

जंगल, प्राणी, जल व जमीन ही निसर्गाची देण आहे. यांचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे, असे मत ए.लक्ष्मी यांनी व्यक्त केले. अनेक वेळा वृक्षारोपण केले जाते. मात्र त्यांचे संगोपन होत नाही. झाडे जिवंत राहत नाहीत याचा खेदही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वतीने गावात वृक्षारोपणासाठी जन्मवृक्ष, लग्नवृक्ष, स्मृतीवृक्ष, संतोषवृक्ष असे विविध उपक्रम वृक्ष लागवडीसाठी राबवावेत. ग्रामपंचायतीसाठी ग्रामवन उपक्रमातून मोठे अनुदान मिळते त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी लक्ष्मी यांच्या हस्ते वृक्षारोपणही पार पडले. 
    
पिंपरी गवळी सरपंच, तनिष्का लिडर आश्विनी थोरात व तनिष्का सदस्यांनी यापुढील काळात गावात येणा-या विविध कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार करण्याऐवजी त्या सत्काराच्या खर्चातून वृक्षारोपण व त्या झाडांचे संगोपन करण्यासाठी सत्काराची रक्कम वापरण्याचा संकल्प यावेळी केला. तसेच इतर गावांनीही हा आदर्श घ्यावा असे आवाहन सरपंच अश्विनी थोरात यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com