पुणे : हिंजवडीत तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

बाबासाहेब तारे
शुक्रवार, 21 जुलै 2017

चेन्नई येथील मुळची असलेली ही तरूणी हिंजवडी येथील आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. 33 वर्षीय तरुणी कंपनीतील कामकाज संपवून स्कुटीवरून घरी जात असताना पाऊस आल्याने एका झाडाखाली रेनकोट घालण्यासाठी थांबली होती. तिला एकटीला पाहून दोन अज्ञात व्यक्ती तिच्याजवळ आल्या व तीच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला.

पुणे : हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नावाजलेल्या कंपनीत कार्यरत तरुणीवर बलात्कार करण्याचा दोघांनी प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. याबाबत पुणे शहर व ग्रामीण पोलिस तपास करत आहेत .घडलेला प्रकार धक्कादायक असून तरुणी या प्रकाराने घाबरून गेली आहे. घाबरलेल्या स्थितीत तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिच्यावर बाणेर येथील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेन्नई येथील मुळची असलेली ही तरूणी हिंजवडी येथील आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. 33 वर्षीय तरुणी कंपनीतील कामकाज संपवून स्कुटीवरून घरी जात असताना पाऊस आल्याने एका झाडाखाली रेनकोट घालण्यासाठी थांबली होती. तिला एकटीला पाहून दोन अज्ञात व्यक्ती तिच्याजवळ आल्या व तीच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला.परंतु त्या तरूणीने 'फेवरेट' या नवीन अॅपवरून मित्र-मैत्रिणींना फोन करून कल्पना दिली. तोपर्यंत रस्त्यावरून जाणा-यांना पाहून संशयीत पळून गेले.
यानंतर तीचे सहकारी तीच्या मदतीला आले व तिला घरी आणले. एवढे घडूनही ती याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करायला घाबरत होती. तीच्या मैत्रीणीने तिला आज सकाळी बाणेर येथील ज्युपिटर रूग्णालयात दाखल केले व पोलिसांनाही माहिती कळवली.

घटनेची माहिती कळताच पुणे शहराचे अतिरीक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन मुलीची भेट घेतली व पुढील तपास करण्यासंदर्भात पोलिसांना सुचना दिल्या. या घटनेचा तपास पुणे शहर व ग्रामिण पोलिस संयुक्तपणे करत आहेत.

अतिरीक्त आयुक्त शशिकांत शिंदे यांनी यावेळी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, या घटनेतील तरुणी ही पुर्णपणे घाबरलेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. तसेच पुणे शहर पोलिस व ग्रामिण पोलिस संयुक्तपणे हा तपास करत असून आरोपींना लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊ.

Web Title: esakal news sakal news IT pune news hinjawadi employee attempt to rape