चतुःशृंगीसाठी सरकते जिने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पुणे -  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चतुःशृंगी देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण करणार आहे. त्यासाठी सात कोटी रुपये खर्च येणार असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल. लहान मुले, वृद्ध व महिला भाविकांना मंदिरापर्यंत पोचण्यासाठी सरकत्या जिन्याची (एस्कलेटर) व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, चतुःशृंगी देवी मंदिर ट्रस्टतर्फे २९ सप्टेंबर ते ८ ऑक्‍टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

चतुःशृंगी देवी मंदिर ट्रस्टतर्फे होणाऱ्या नवरात्रोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये नवरात्रोत्सव, मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरणाबाबत  ट्रस्टचे अध्यक्ष किरण अनगळ व कार्यकारी विश्‍वस्त दिलीप अनगळ यांनी माहिती दिली. यंदाचे सालकरी अभिषेक अरुण अनगळ यांच्यासह सर्व विश्‍वस्त उपस्थित होते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचा खर्च मंदिर ट्रस्ट, देणगीदार व भाविकांच्या निधीतून भागविणार आहे.

जीर्णोद्धाराचा आराखडा महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला असून, दिवाळीनंतर भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात मंदिराचे काम होईल, त्यानंतर पुढील नवरात्रोत्सवानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाईल, असे दिलीप अनगळ यांनी सांगितले.

असे आहे मंदिराचे ‘मॉडेल’! 
मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण करताना मंदिराचा गाभारा आहे तसाच ठेवला जाईल. मंदिराची व्यवस्था तीन मजल्यानुसार असेल. सर्वांत खालच्या मजल्यावर ध्यानमंदिर, दुसऱ्या मजल्यावर पुजारी निवासस्थान व तिसऱ्या मजल्यावर मंदिर, अशी व्यवस्था असेल. महिला व पुरुष भाविकांना ये-जा करण्यासाठी तीन स्वतंत्र जिने असणार आहेत. त्याचबरोबर नवरात्राबरोबरच वर्षभर उपयोगात येईल, यादृष्टीने सरकता जिना असेल. 

नवरात्रोत्सवाची वैशिष्ट्ये 
  यंदा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास चांदीचे छत 
  रविवारी (ता. २९) सकाळी साडेसात वाजता घटस्थापना
  आठ ऑक्‍टोबरला सीमोल्लंघनानंतर पालखी प्रस्थान,
     हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
  पॉलिटेक्‍निक महाविद्यालय मैदानावर मोफत पार्किंग
  अद्ययावत रुग्णवाहिका, १८ डॉक्‍टरांचे पथक २४ तास उपलब्ध
  भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Escalator For chaturshrungi