महा ई सेवा केंद्रे कराराशिवाय सुरूच

Online-Services
Online-Services

पुणे - शहरातील अनेक महा ई सेवा केंद्रे करारपत्रांशिवाय सुरू आहेत. ही बाब तहसील कार्यालयाने केलेल्या तपासणीत उघड झाली. प्रत्येक केंद्राने कराराची प्रत ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, ‘महाऑनलाइन’कडूनच या केंद्रांना करारपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरात ६८ महा ई सेवा केंद्रे आहेत. यापैकी काहींमध्ये प्रतिज्ञापत्र, उत्पन्न, जातीचा किंवा अन्य दाखला काढण्यासाठी जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी तपासणी मोहीम सुरू केली. तेव्हा तहसील कार्यालयाजवळील केंद्रामध्ये जादा शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले. तसेच, दरपत्रक लावले नसल्यामुळे हे केंद्र सीलबंद केले. परवानगी दिलेल्या ठिकाणाऐवजी दुसऱ्याच ठिकाणी सुरू केलेल्या अन्य एका महा ई सेवा केंद्रावरही कारवाई केली.

‘महाऑनलाइन’कडून महा ई सेवा केंद्र सुरू करण्याचे परवाने देण्यात येतात. त्यानुसार ऑनलाइन दाखले देण्याचे करारपत्र करण्यात येते. परंतु, अनेक महा ई सेवा केंद्रांचे करारपत्रच झालेले नाही.
- तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com