"ईएसआयसी'चे बिबवेवाडीतील रुग्णालय होणार दोनशे बेडचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - बिबवेवाडी येथील कामगारांसाठीच्या "ईएसआयसी' रुग्णालयाचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून, रुग्णालयाची क्षमता 50 बेडवरून दोनशे बेडपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

ईएसआयसी कॉर्पोरेशन समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच या रुग्णालयास भेट घेऊन तेथील कामाचा आढावा घेतला.

"ईएसआयसी कॉर्पोरेशन'च्या 174 व्या बैठकीत बिबवेवाडीतील रुग्णालयाची क्षमता 50 बेडवरून दोनशे बेड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बेडक्षमता 500 पर्यंत वाढविण्यासही कॉर्पोरेशनने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने खासदार खैरे यांनी रुग्णालयास भेट दिली होती. या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. झोडे, उपनिदेशक राजीव चौधरी, डॉ. अंकित कुमार, किरण ढमाले, दत्ता देशपांडे, व्ही. एस. देशपांडे, बी. पी. रसाळ, हिमांशू निमजे, अजित कुमार, पंकज बेल्हेकर, श्री हर्षा उपस्थित होते. ईएसआयसी पश्‍चिम महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन इंगळे यांनी रुग्णालयाचा विस्तार करताना कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली. त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन खैरे यांनी दिले.

Web Title: ESIC Hospital 200 bed chandrakant khaire