बालरंगभूमीच्या पुणे जिल्हा शाखेची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : बालरंगभूमीच्या पुणे जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली आहे. पुणे शाखेच्या सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत बाल रंगभूमीची स्थापना करण्यात आली. त्याची पार्श्वभूमी, भविष्यात राबवण्याचे उपक्रम यावर या सभेत चर्चा झाली.

शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, बालनाट्य प्रशिक्षकांसाठी नाट्यप्रशिक्षण शिबीर आदी उपक्रम शाखेतर्फे राबविण्यात येणार आहेत. या सभेला नाट्य परिषद , कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा प्रमुख दीपक रेगे आणि बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रकाश पारखी व प्रमुख कार्यवाह सतीश लोटके उपस्थित होते.

Web Title: The establishment of the Pune District Branch of Balangbhoomi