इथेनॉल दरवाढीचा निर्णय साखर उद्योगासाठी दिलासादायक; हर्षवर्धन पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इथेनॉल दरवाढीचा निर्णय साखर उद्योगासाठी दिलासादायक; हर्षवर्धन पाटील

इथेनॉल दरवाढीचा निर्णय साखर उद्योगासाठी दिलासादायक; हर्षवर्धन पाटील

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरवाढीचा तसेच पेट्रोलमध्ये सन २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा धोरणात्मक निर्णय हा साखर उद्योगासाठी दिलासादायक देणारा व स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: कोरोना रुग्ण संख्या घटल्याने आरोग्य कर्मचारी कमी करण्याची सूचना

पाटील यांनी साखर उद्योगाला दीर्घ कालीन आधार देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक व महा मार्ग मंत्री नितिन गडकरी, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे अभिनंदन केले.

पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत साखर हंगाम सन २०२१-२०२२ साठी सदर दरवाढीस मंजुरी देण्यात आली. या वाढीमुळे आता इथेनॉलला बी - हेवी मोलासिससाठी ४६.६६ रुपये, सी - हेवी मोलासिसला ५९.०८ रुपये, ऊसाच्या रसास ६३.४५ रुपये प्रति लिटर असा दर मिळणार आहे. सदरची वाढ ही प्रतिलिटर १ रुपया ४७ पैसे पर्यंत देण्यात आली असून त्यामुळे इथेनॉल पुरवठादारांना किमतीमध्ये स्थिरता मिळणार आहे.

हेही वाचा: VIDEO : दोन टप्पी चेंडू अन् वॉर्नरचा तडाखा

साखर उद्योगाबरोबरच मका, भात, बिट आदी पासूनही इथेनॉलचेउत्पादन घेतले जात आहे, त्यामुळे या दरवाढीचा देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल. दरम्यान केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ साखर उद्योगा पुढील अडचणी दूर करण्यासाठी नुकतेच भेटले होते. त्यानुसार साखर उद्योगाला दिलासा देणारे निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जात असल्याने या उद्योगास आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास निश्चित मदत होईल अशा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

loading image
go to top