इथेनॉलमुळे ३० हजार कोटींच्या परकीय चलनाची बचत

आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. परंतु इथेनॉलच्या देशांतर्गत उत्पादनामुळे २०२२ मध्ये इंधनाच्या आयातीवर होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ३० हजार कोटींच्या परकीय चलनाची बचत होणार आहे.
Ethanol
EthanolSakal
Summary

आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. परंतु इथेनॉलच्या देशांतर्गत उत्पादनामुळे २०२२ मध्ये इंधनाच्या आयातीवर होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ३० हजार कोटींच्या परकीय चलनाची बचत होणार आहे.

पुणे - आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलच्या दरात (Petrol Rate) वाढ झाली आहे. परंतु इथेनॉलच्या (Ethanol) देशांतर्गत उत्पादनामुळे (Production) २०२२ मध्ये इंधनाच्या (Fuel) आयातीवर होणाऱ्या खर्चापैकी (Expenditure) सुमारे ३० हजार कोटींच्या परकीय चलनाची बचत होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आणि साखर उद्योगाचा देशाच्या अर्थकारणाला हातभार लागणार असून, तेवढा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे.केंद्र सरकारने देशात एक हजार इथेनॉल प्रकल्पांना (आसवनी) यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यापैकी ६५० प्रकल्पांमध्ये धान्यावर प्रक्रिया करून तर, ३५० साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुमारे दीड हजार कोटी लिटर इथेनॉलचे वार्षिक उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी सध्या महाराष्ट्रात ७१ साखर कारखान्यांकडून इथेनॉल निर्मिती सुरू आहे.

२०२१ मध्ये देशात तीनशे कोटी लिटर आणि महाराष्ट्रात ८० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले. २०२२ मध्ये देशात ५५० कोटी लिटर आणि राज्यात १४० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे लक्ष्य आहे. त्यापैकी राज्यात मार्चअखेर सुमारे ३० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत १० टक्के तर, १ एप्रिल २०२३ हा दिवस २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचे (पेट्रोल-इथेनॉल ब्लेंडिंग) लक्ष्य ठेवले आहे. सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण धोरण ८ टक्के इतके आहे. अपेक्षित उत्पादन झाल्यास पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रणाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे देशाच्या साखर उद्योगातील इथेनॉलमधील उलाढाल किमान ३० हजार कोटींपर्यंत वाढेल, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

इथेनॉल दर प्रतिलिटर

  • उसाच्या रसापासून आणि सिरपपासून इथेनॉल दर : ६३ रुपये

  • बी हेवी मोलॅसिस : ५९ रुपये

  • सी हेवी मोलॅसिस : ४६ रुपये

  • महाराष्ट्रातील इथेनॉल उत्पादन

  • साखर कारखाने : ७१

  • डिसेंबर २०२२ अखेर अपेक्षित उत्पादन : १४० कोटी लिटर

  • मार्च २०२२ अखेर उत्पादन : सुमारे ३० कोटी लिटर

रशिया-युक्रेन युद्धाचा देशातील तेलाच्या किमतीवर थेट परिणाम झालेला नाही. तर, या युद्धामुळे आखाती देशांनी क्रूड ऑइलच्या दरात वाढ केली. परिणामी क्रूड ऑइल खरेदीसाठी भारताला परकीय चलन मोठ्या प्रमाणावर द्यावे लागत आहे. परंतु इथेनॉलच्या उत्पादनामुळे परकीय चलनात बचत होणार आहे.

- डॉ. संजय भोसले, सहसंचालक (उपपदार्थ), साखर आयुक्तालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com