ई-वाहनधारकांसाठी खूशखबर! ‘पीएमपी’ उभारणार १२२ चार्जिंग स्टेशन

Electric-Bus
Electric-Bus

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी ई-वाहनधारकांसाठी खूशखबर! कारण पीएमपी दोन्ही शहरांत १२२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारत आहे. पीएमपीच्या बसबरोबरच दुचाकी, मोटारी आणि रिक्षांना या ठिकाणी चार्जिंग करता येणार आहे. यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीच्या ताफ्यात डिसेंबरअखेर टप्प्याटप्प्याने ५०० ई-बस दाखल होणार आहेत. सध्या १५० ई-बस आहेत. त्यांच्यासाठी चार्जिंगची व्यवस्था भेकराईनगर आणि निगडी डेपोत व्यवस्था आहे. मात्र ती तोकडी आहे. काही महिन्यांत आणखी ई- बस दाखल होणार असल्यामुळे चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमपीने पुढाकार घेतला आहे. चार्जिंगची सुविधा वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली. चार्जिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही महसूल पीएमपीला मिळेल, असे त्यांनी सांगितले. 

कंपन्या करणार गुंतवणूक 

  • पीएमपी आगार आणि स्थानकांच्या दहा टक्के जागांत चार्जिंग स्टेशन उभारणार 
  • त्यासाठीचा खर्च संबंधित खासगी कंपनी करणार  
  • आगारांत दिवसा बस नसतात. त्यामुळे तेथे सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान खासगी वाहने चार्जिंग करून देणार
  • चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी अनेक राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्ताव दाखल  
  • काही नव्या स्टार्टअप्सचाही समावेश

अशी असेल पुढची वाटचाल
चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी स्वारस्य दाखविलेल्या कंपन्यांबरोबर पीएमपीची बैठक होणार असून, त्यात त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे, हे स्पष्ट केले जाईल. त्यानंतर त्यांना निविदा भरण्यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली जाईल. १ मार्च रोजी निविदा उघडल्या जातील. संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यावर लगेचच चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होऊ शकते. 

चार्जिंगला लागणारा वेळ

  • ३.३० तास एका बससाठी
  • २ तास रिक्षासाठी
  • ३५ मिनिटे दुचाकीसाठी
  • ९० मिनिटे मोटारीसाठी

येथे होणार स्टेशन -

  • स्वारगेट
  • न.ता.वाडी
  • कोथरूड
  • हडपसर
  • कात्रज
  • पुणे स्टेशन
  • मार्केट यार्ड
  • निगडी
  • भोसरी
  • पिंपरी
  • बालेवाडी
  • भेकराईनगर
  • शेवाळवाडी
  • याशिवाय दोन्ही शहरांतील प्रमुख १०९ स्थानके

चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या कंपन्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे, असा आग्रह आहे. पीएमपीच्या नरवीर तानाजीवाडी डेपोमध्ये सीएनजीच्या पंपावर खासगी वाहनांनाही प्रवेश आहे. त्यानुसार १२२ चार्जिंग स्टेशनवर खासगी वाहने त्यांची बॅटरी चार्ज करू शकतील.
- प्रशांत कोळेकर, अधिकारी, विद्युत विभाग, पीएमपी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com