सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 लाख

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाच्या वतीने 50 लाख रूपये देणार आहोत. शिवाय, लोकांना औषधे पुरविणयात येणार आहे. पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शिबिर घेतील.

पुणे : राज्यात पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, रायगड, पालघर या जिल्ह्यातील लोकांची गंभीर स्थिती आहे. या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी, असेही ते म्हणाले.

पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत. ते म्हणाले, पिकांच्या उंचीपेक्षा अधिक पाणी साचले आहे. द्राक्ष आणि डाळिंबाला फटका बसला. शेती आणि जमिनीवरची माती वाहून गेल्यामुळे दीर्घकालीन नुकसान झाले आहे. हे जिल्हा दूध संकलन आणि पुरवण्याचे मुख्य केंद्र आहे. त्यालाही धक्का बसला आहे. पुराने जे नुकसान झाले ते पाहता अशी परिस्थिती कधीच नव्हती. या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले. कोल्हापूर, सांगली हा भाग ग्रस्त झाला आहे. पिकांचे नुकसान, जनावरं, व्यक्तिगत नुकसान होत आहे. गावही उद्ध्वस्त झाले. 

तसेच ते पुढे म्हणाले, पाणी ओसरताच राज्य सरकारने पंचनामे करून मदत करावी. नुकसानीचे प्रमाण पाहता या भागांत पूर्णपणे कर्जमाफी करावी. प्रचंड अडचणी निर्माण झाल्या असूनही, प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. उणीदुणी काढण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 लाख

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाच्या वतीने 50 लाख रूपये देणार आहोत. शिवाय, लोकांना औषधे पुरविणयात येणार आहे. पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शिबिर घेतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everyone should come together and help flood victims says Sharad Pawar