झाडे जगवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-  साध्वी प्रीतिसुधाजी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

पिंपरी : 'भगवान महावीर यांनी "जिओ और जिने दो.." हा संदेश दिला आहे. प्राणीमात्रांविषयी करूणाभाव ठेवण्याची भावना जपताना झाडे जगवण्याचे काम देखील आपण केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे'', असे प्रतिपादन वाणीभूषण साध्वी प्रीतिसुधाजी यांनी रहाटणी येथे केले. 

पिंपळेसौदागर येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघातर्फे रहाटणी येथील रॉयल ऑरेंज काऊंटी सोसायटीत उभारलेल्या रसिकलाल धारिवाल जैन स्थानकाच्या उद्‌घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. उद्योजिका शोभा धारिवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. खासदार श्रीरंग बारणे, उद्योजक राजेशकुमार सांकला, बाळासाहेब धोका, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री अशोककुमार पगारिया, नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संघाचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र लुंकड आदी उपस्थित होते. 

साध्वी प्रीतिसुधाजी म्हणाल्या, "देहू येथील सरकारी गायरानात 2 लाख झाडे लावण्याच्या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यायला हवा. प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेण्याचा संकल्प सोडला पाहिजे.'' 

बारणे म्हणाले, "जैन समाज हा शांतताप्रिय आणि प्रेरणा देणारा आहे. जैन स्थानकाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम व्हायला हवे.'' 

अनुप नहार, सचिन सोनिगरा, इंदिरा गुगळे, निर्मल चोरडिया यांनी संयोजन केले. मावळते अध्यक्ष सुगनमल संकलेचा यांनी प्रास्ताविक केले. रितिक ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बरडिया यांनी आभार मानले. 

अन धारिवाल गहिवरल्या.. 

उद्योजिका शोभा धारिवाल या त्यांचे पती दिवंगत उद्योजक रसिकलाल धारिवाल यांच्या आठवणी सांगताना गहिवरून गेल्या. धारिवाल म्हणाल्या, "कमावलेल्या पैशातील काही हिस्सा समाजासाठी देण्याची भूमिका माझ्या पतीने कायम ठेवली. काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी समाजोपयोगी कामे केली.''   

Web Title: Everyone's participation is important for the development of trees- Sadhvi Preetisudhaji