माजी कृषी संचालकांकडे दीड कोटींची बेकायदा संपत्ती ! 

माजी कृषी संचालकांकडे दीड कोटींची बेकायदा संपत्ती ! 

पुणे - निवृत्त विस्तार शिक्षण व साधनसामग्री संचालकाने त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या मदतीने 1988 पासून तब्बल दीड कोटींची बेकायदेशीर संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुरेश नामदेव आंबुलगेकर (वय 60) असे संचालकाचे नाव असून, ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत कार्यरत होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मंगाराणी सुरेश आंबुलगेकर (वय 56) आणि मुलगा नितीन सुरेश आंबुलगेकर (वय 30, सर्व रा.मु.पो. मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड) यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी तक्रार दिली होती. तर, प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांनी केला. 

आंबुलगेकर यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी जुलै 1980 ते जून 2014 या कालावधीत 1 कोटी 55 लाख 15 हजार 426 रुपयांची संपत्ती कमविल्याचे निष्पन्न झाले आहे. 

राज्यातील चार शहरांमध्ये सदनिका व भूखंड ! 
आंबुलगेकर यांची नांदेड, औरंगाबाद, लातूर आणि पुणे येथे स्थावर मालमत्ता असल्याचे तपासातून समोर आले. त्यामध्ये अनेक सदनिका आणि भूखंड असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. त्यांची 2014 पासून चौकशी सुरू होती. ही संपत्ती कशाच्या माध्यमातून कमावली याची कागदपत्रे पोलिसांनी मागितली होती. मात्र, त्या संपत्तीबाबत ते कोणतेही योग्य कागदपत्रे देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांच्या सर्व मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर तिघांवरही विभागाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com