विद्यमान नगरसेवक बाळासाहेब साधू सातव यांचे निधन

Ex corporator Balasaheb Sadhu Satav passes away
Ex corporator Balasaheb Sadhu Satav passes away

बारामती शहर : नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक बाळासाहेब साधू सातव (वय 50) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज आकस्मिक निधन झाले. 

आज सकाळी त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाला. या त्रासामुळे ते दवाखान्यातही जाऊन आले, मात्र त्या वेळेस त्यांचा ईसीजी व्यवस्थित होता. मात्र घरी आल्यानंतर पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले म्हणून ते झोपायला गेले. मात्र काही वेळानंतर त्यांची हालचाल होत नाही म्हणून कुटुंबियांनी पाहिले असता ते अत्यवस्थ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. 

बाळासाहेब सातव नुकतेच बारामती नगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती झाले होते व त्यांनी जोमाने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यास प्रारंभ केला होता. नुकत्याच नगरपालिकेला मिळालेल्या घंटागाड्यांच्या माध्यमातून त्यांनी शहर स्वच्छ कसे राहिल याचा प्रयत्न सुरु केला होता. त्यांच्या अचानक निधनामुळे नगरपालिका वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बाळासाहेब सातव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com