माजी आमदार मोहिते पोलिस ठाण्यात हजर

हरिदास कड
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

चाकण हिंसाचारप्रकरणी मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन दिला आहे.

चाकण ः चाकण हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आज पोलिस ठाण्यात हजेरी लावली.गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे यांनी त्यांची सुमारे दोन तास चौकशी केली. 

चाकण हिंसाचारप्रकरणी मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन दिला आहे.पण,चाकण पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावे,असा निर्देश दिल्याने ते आज चाकण पोलिस ठाण्यात हजर झाले होते. 

दरम्यान, या हिंसाचाराशी माझा काडीचाही संबंध नाही,असे मोहिते यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला आहे,असे त्यांचे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex mla dilip mohite in police station