घुले विदयालयात रंगला माजी विद्यार्थी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

हडपसर - शिक्षकांनी शाळेत केलेली शिक्षा... यशानंतची शाबासकी... वर्गात मागच्या बाकावर बसून केलेल्या खोड्या.. शाळेशी जडलेले ऋणानुबंध उलडगत आणि शाळेतील संस्कारांच्या बीजांमुळे घडल्याची ग्वाही देत रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी येथील के. के. घुले विद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा विशेष रंगला. दहावीच्या २००१ सालचे विदयार्थी तब्बल १७ वर्षांनी भेटल्याने प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यात भाग घेतला. 

अरे तू शरिराने खुपच बदलला... पण तुझा भोळेपणा अजून तसाच आहे.. वेंधापणा सोडला ता नाही ? आता तरी तूला इंग्लीश वाचता येते की नाही... कंजूषपणा सोडला की नाही?  असे एकमेकांना चिमटे काढत  वर्गमित्र आणि मैत्रीणी पून्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सर्व विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या परिवाराविषयी माहिती दिली. तसेच सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर केल्या व काहींनी आनंदश्रूंतून भावना व्यक्त केला. भविष्यात पुन्हा एकमेकांना भेटण्याची व स्नेह प्रेमभाव वृध्दींगत करण्याचे अश्वासन देत सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. स्वागत गजेंद्र मोरे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश टकले यांनी केले तसेच आभार कुलदीप बेल्हेकर यांनी केले. कृपाल पलुस्कर, सागर घुले, गणेश कुंजीर, अमित बेल्हेकर, कीर्ती घुले, कामिनी ढवळे, शितल औताडे, दीपाली घावटे अर्चना दगडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी माजी विदयार्थ्यांनी शाळेतील कर्मचा-यांचा सत्कार केला. वर्गणी गोळा केली. त्यातून शाळेतील प्रयोगशाळेसाठी फ्रीज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच माजी विदयार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी तन, मन आणी धनाने मदत करण्याचा संकल्प केला.  
 
Web Title: Ex-student gathering organized in Ghule University