हवेली तालुक्यात पोलिस पाटील भरतीसाठी येत्या रविवारी परिक्षा

जनार्दन दांडगे
सोमवार, 7 मे 2018

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील 38 गावांच्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा येत्या रविवारी (ता. 13) होणार असल्याची माहिती हवेली उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी दिली. दरम्यान मागील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये जाहीर केलेली पोलीस पाटील पदासाठीची भरती प्रक्रिया व लेखी परीक्षा काही प्रशासकीय अडचणींमुळे रद्द करण्यात आली होती. 

हडपसर येथील साधना विद्यालय व आर. आर. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रावर सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी प्रवर्गानुसार एकूण ९३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 11 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असून उर्वरीत 82 उमेदवारांची परीक्षा होणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी उपविभागीय कार्यालयातून परीक्षेचे प्रवेशपत्र घेवून जावे तसेच परीक्षेसाठी येताना अर्जासोबत जोडलेली मुळ कागदपत्रांच्या मूळ प्रती व आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पँनकार्ड, वाहन परवाण्याच्या मुळ व छायांकित प्रती बरोबर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पोलिस पाटील पदासाठीचे आरक्षण व गावांची यादी पुढीलप्रमाणे :- 
अनुसूचित जाती - मांजरी बुद्रुक. 
अनुसूचित जाती महिला - हिंगणगाव, सोरतापवाडी, भिलारेवाडी.
अनुसूचित जमाती - सांबारेवाडी, सांगावी सांडस, खामगाव टेक, किन्हई, काळेवाडी.
अनुसूचित जमाती महिला - नायगाव, थोपटेवाडी.
विशेष मागास प्रवर्ग महिला - डोणजे.
विशेष मागास प्रवर्ग - मणेरवाडी.
विमुक्त जाती (अ) महिला - तळेरानवाडी.
विमुक्त जाती (अ) - आंबी, फुरसुंगी.
भटक्या जमाती (ब) महिला - गोगलवाडी, अवसरेनगर, तरडे.
भटक्या जमाती (ब) - शिंदेवाडी, तानाजीनगर.
भटक्या जमाती (क) - मांडवी खुर्द.
इतर मागास वर्ग (महिला) - मोगरवाडी, साष्टे, शेवाळवाडी.
इतर मागास वर्ग - होळकरवाडी, सणसनगर.
इतर मागास वर्ग (खुला) - निरगुडी, खडकवाडी.
खुला प्रवर्ग (महिला) - औताडे हांडेवाडी, मांगडेवाडी, अहिरे, साडेसतरानळी.
खुला प्रवर्ग - जांभळी, जांभूळवाडी, गुजर निंबाळकरवाडी, कुडजे, वडाची वाडी.

Web Title: Exam for police patil in haveli tehsil