पुणे : उत्तरपत्रिकांची तपासणी निवृत्त मुख्याध्यापकांकडे

दहावी-बारावीबाबत शिक्षण मंडळाने शाळांची माहिती अपडेट न केल्याचा परिणाम
Examination Answer Sheets Retired Headmaster
Examination Answer Sheets Retired Headmastersakal

पुणे : दरवर्षी सर्व शाळांचे मुख्याध्यापक आपापल्या शाळांचे परिक्षा नियंत्रक, विषय शिक्षकांची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पाठवतात. मात्र, मंडळाकडून ही माहिती अद्ययावत करण्यात येत नसल्याने सेवानिवृत्त किंवा बदली झालेल्या शिक्षकांच्या नावाने दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. परिणामी अध्यापन न करणाऱ्या शिक्षकांना मराठीच्या उत्तरपत्रिका पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत काही मुख्याध्यापकांशी ‘सकाळ’ने संपर्क साधला असता मिळालेली माहिती अशीः प्रत्येक शाळेने आपली माहिती ऑनलाईन अद्ययावत करण्याची सूचना गेल्यावर्षी मंडळाने केली होती. त्यानुसार सर्व शाळांनी ते केले. तरीही मंडळाने हा डाटा अद्ययावत केलेला नाही. त्यामुळेच काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या नावे आदेश आले आहेत. मावळमधील एका मुख्याध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणे व नियंत्रकासंदर्भात आदेश आले आहेत. वास्तविक संबंधित मुख्याध्यापक ते विषय शिकवतही नाही. यानंतर दोन दिवसांनी ते स्वतः मंडळात गेले. संबंधित अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यावर आदेश रद्द केला.

मुख्याध्यापक संघाचे पत्र

सध्या माहिती अपडेट न केल्यामुळे सगळीकडेच गोंधळ सुरू आहे. इंग्रजीच्या शिक्षकांना मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या आहेत आणि त्या २३ मार्चपर्यंत नियंत्रकाकडे द्यायच्या आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक, केंद्र संचालक व उपकेंद्र संचालकांना शक्यतो उत्तरपत्रिक देऊ नयेत, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण मंडळाकडे केली आहे.मंडळाकडून दरवर्षी माहिती घेण्यात येते. पण ती अद्ययावत केली जात नाही. शिक्षक समितीची व्यवस्थित नेमणूक केली पाहिजे. तीन महिन्यापूर्वी माहिती देऊनही जुन्याच शिक्षकांच्या नावाने ऑर्डर निघालेली आहे. तत्काळ माहिती अपडेट होणे आवश्‍यक आहे.

-महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ

‘‘शाळांकडून माहिती दिली जाते. पण कधी कधी नावात साम्य असल्यामुळे असा गोंधळ होऊ शकतो. पण अशी तक्रार आल्यास तत्काळ सोडविण्यात येत आहे.’’

-अनुराधा ओक, सचिव, शिक्षण मंडळ, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com