एटीएम कार्डची अदलाबदल करुन शेतकऱ्याला सव्वा लाखांचा गंडा

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

उरुळी कांचन - हातचलाखीने ए.टी.एम. कार्डची अदलाबदल करुन, हिंगणगाव (ता. हवेली) येथील शेतकऱ्यास एका अनोखळी तरुनाने सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाळासाहेब म्हस्कू थोरात (वय- ५९  रा. हिंगणगाव, ता. हवेली ) हे फसवणुक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असुन, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात हे रविवारी (ता. 9) उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एटीएमधुन पैसे काढण्यासाठी गेले असता, कांही तांत्रिक कारणामुळे, थोरात यांच्या मधून पैसे निघु शकले नव्हते. मात्र त्याचवेळी एटीएममध्ये आलेल्या एका अनोळखी तरुनाने पैसे काढून देतो असे सांगत थोरात यांच्याकडुन एटीएम कार्ड आपल्या हातात घेतले. तसेच सदर कार्ड ए.टी.एम. मशीन मध्ये घालुन थोरात यांना सदर कार्डचा पिन नंबर दाबण्याची विनंती केली. मात्र याही वेळेस थोरात पैसे न मिळाल्याने सदर तरुनाने थोरात यांना ए.टी.एम परत दिले. थोरात यांनीही सदर तरुनाने दिलेले ए.टी.एम. कार्ड न पाहताच खिशात टाकले. 

दरम्यान एटीएम मधून पैसे का निघत नाही याबाबतची माहिती घेण्यासाठी, थोरात मंगळवारी बँकेत जाऊन बँक अधिकाऱ्याकडे विचारना केली असता अधिकाऱ्याने दिलेल्या माहिवरकुन थोरात यांना धक्का बसला. कारण थोरात यांच्या कार्डवरुन रविवारी लोणी काळभोर (ता. हवेली) येथून चाळीस हजार, सोमवारी (कर्जत जि. अहमदनगर) येथून चाळीस हजार तर मंगळवारी तारकपूर (जि. अहमदनगर) येथुन चाळीस हजार असे एक लाख विस हजार काढुन घेतल्याची माहिती संबधित अधिकाऱ्याने थोरात यांना दिली. यावर थोरात यांनी रविवारी संबधित तरुनाने दिलेल्ये एटीएम कार्ड पहिले असता, संबधित कार्डवर विजय रामचंद्र गाईक असे नाव आढळून आले. यावर थोरात यांनी तातडीने लोणी काळभोर पोलिसात जाऊन फसवणुकीची तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.

Web Title: With the exchange of ATM card, one robbed a farmer